पनवेल रेल्वे स्थानक समस्येंच्या गर्तेत
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 05, 2021
- 570
पनवेल : कोरोना काळात उपनगरीय रेल्वे सेवा सर्व सामान्यांसाठी बंद जरी असली तरी लांब पल्यांची रेल्वे सेवा सुरू आहे. पनवेल स्थानकातून परराज्यात जाणार्या 20 ते 25 गाड्या रोज येत असतात. अशात प्रवाशांकडून बर्याच तक्रारी भारतीय रेल्वे मंत्रालय सल्लागार समिती सदस्य अभिजीत पाटील यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर अभिजीत पाटील यांनी पनवेल स्टेशन प्रबंधक यांची भेट घेत प्रवाशांना होत असलेल्या समस्यांचा पाढा वाचला.
यावेळी त्यांच्या सह पनवेल प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डॉ भक्तिकुमार दवे, यशवंतराव ठाकरे-पनवेल प्रवासी संघाचे उपाध्यक्ष, डॉ. मनीष बेहरे, पनवेल प्रवासी संघ सदस्य, कुणाल लोंढे, रेल्वे स्थानक स्थानीय प्रवासी संघटनेचे सल्लागार उपस्थित होते. यावेळी नागपूर ते गोवा, मडगाव रेल्वे सेवा ही फक्त सन आणि उत्सवांच्या वेळीच सुरू असते. पनवेल आणि आजूबाजूच्या शहरात विदर्भात तसेच कोकण आणि गोव्याला जाणार्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने ही रेल सेवा दररोज सुरू करावी अशी प्रमुख मागणी केली. पनवेल रेल्वे स्थानकामध्ये 7 फलाट असून त्यातील 4 उपनगरी तर 3 लांब पल्ल्याच्या गाड्यांकरिता वापरले जातात. लांब पल्ल्यांच्या गाड्या 5, 6 आणि 7 प्लॅटफॉर्म वरून वाहतूक सुरू असते. मात्र अशात प्रवाश्यांना शौचालयासाठी फक्त एकच स्वचछतागृह आहे. त्यात पाण्याची व्यवस्था नाही. परराज्यात जाणार्या गाड्यांची वेळ मागे पुढे होत असते. बर्याचदा वाट पाहावी लागते. रेल्वे स्थानकात एकच विश्रामगृह आहे ते कमी पडत आहे. बसण्यासाठी असलेली बाकही मोडकळीस आलेली आहेत. त्यात पिण्याच्या पाण्यासाठी असलेली नळ सुरूच असलेली पाहायला मिळतात. त्याचे पाणी सुद्धा प्लॅटफॉर्म वर वाहत असते. त्यात बर्याच ठिकाणी खड्डे आहेत. प्लॅटफॉर्म वर इलेक्ट्रिक डिपीतील वायरी बाहेर पडलेल्या आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अनेक समस्या पनवेलचे स्टेशन प्रबंधक यांच्या समोर मांडल्या. या समस्या सोडविण्याचे आपले आद्य कर्तव्य असल्याचे अभिजीत पाटील यांनी ठणकावून सांगितले. यानंतर स्टेशन बंधक यांनी लगेच समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश संबधित अधिकारी आणि कांत्रादरास दिले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai