पॅसेंजर गाड्या धावणार

मुंबई ः गणेशोत्सवासाठी रत्नागिरी दिवा पॅसेंजर, रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर, सावंतवाडी-दिवा पॅसेंजर, मडगाव-सावतंवाडी पॅसेंजर या गाड्या 7 ते 30 सप्टेंबर या कालावधीत धावणार आहेत. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे फेस्टीव्हल स्पेशल गाड्या सोडणार आहे. गेले अनेक दिवस बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या फेस्टिव्हल स्पेशल नावाने 7 ते 30 सप्टेंबर दरम्यान सोडण्यात येणार आहेत. या सर्व गाड्या आरक्षित असणार आहेत. 01501 रत्नागिरी-मडगाव ही गाडी 6 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. 01508/ 01507 मडगाव- सावंतवाडी-मडगाव ही गाडी 7 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. 01506/ 01505 ही सावंतवाडी-दिवा गाडी 7 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

..................................................

तब्बल 2062 जागांसाठी शिक्षक भरती

मुंबई : राज्यातील शिक्षण विभागात एकूण 2062 जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया होत आहे. यात शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या उमेदवारांपैकी 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस केली आहे. याबाबत राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीच घोषणा केली. त्यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2062 रिक्त पदांसाठी 15123 पसंतीक्रमावर 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा!

...........................................

विद्यार्थ्यांना एक दिवसाचा पास 

मुंबई ः राज्यात 4 सप्टेंबर रोजी होणार्‍या एमपीएससी स्पर्धा परीक्षांच्या पार्श्वभूमी मध्य रेल्वेने उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना एक दिवसाचा पास इश्यू करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. यासाठी परीक्षार्थीकडे हॉल तिकीट असणे बंधनकारक आहे. हॉल तिकीट दाखवल्यानंतरच लोकलचे तिकीट मिळेल, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.