माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 27, 2021
- 1043
पनवेल : पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नुकताच माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. ऑनलाईन पद्धतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या 270 हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्याला आपली उपस्थिती दर्शविली.
या मेळाव्यासाठी उपस्थित असणार्या सर्व माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर साहेब यांनी महाविद्यालयासाठी माजी विद्यार्थी मंडळाने दिलेल्या आतापर्यंतच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले. यापुढेही असेच सहकार्य माजी विद्यार्थ्यांकडून मिळेल, अशी आशाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. यावेळी महाविद्यालयाच्या घोडदौडीचा आढावाही त्यांनी घेतला. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी महाविद्यालयाच्या दैदिप्यमान वाटचालीचा अभिमान वाटत असल्याचे सूतोवाच केले. माजी विद्यार्थी नेहमी महाविद्यालयाच्या विकासात योगदान देण्यासाठी कटिबद्ध असतील, असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. अतुल पाटील यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीला अनेक शुभेच्छा दिल्या. परेशशेठ ठाकूर यांनी महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रातला उच्चांक गाठलेला पाहून अत्यानंद होत असल्याची भावना व्यक्त केली. याप्रसंगी अरुण कुंभार, डॉ. शैलेश वाजेकर, उल्का धुरी, साधना घरत, सूर्यकांत ठाकूर, प्रशांत देशमुख शा अनेक नामवंत माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai