‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेला उत्तम प्रतिसाद
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 18, 2021
- 557
4 दिवसात 7234 नागरिकांचे घराजवळ लसीकरण
नवी मुंबई ः 11 ते 14 एप्रिल या कालावधीत राबविण्यात आलेल्या ‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेमध्येही नवी मुंबई महापालिकेने अत्यंत उत्तम कामगिरी केलेली आहे. या मोहीमेअंतर्गत महापालिका ‘लसीकरण आपल्या दारी’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली. यामध्ये 4 दिवसात 7234 नागरिकांचे घराजवळ कोव्हिड लसीकरण करण्यात आले. मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे ही मोहिम नवी मुंबईत यशस्वीपणे पार पडली.
कोव्हीड 19 लसीकरणामध्ये नवी मुंबई महानगरपालिका सुरूवातीपासूनच आघाडीवर असून शासनामार्फत देण्यात आलेले पहिल्या डोसचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. आत्तापर्यंत 18 वर्षांवरील 99.63% नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतलेला असून 51.30 % नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणारी नवी मुंबई ही एमएमआर क्षेत्रातील अग्रणी महापालिका आहे. लसीकरण आपल्या दारी अंतर्गत 4 रुग्णवाहिका तसेच रूग्णवाहिकेमध्ये रूपांतरित केलेल्या 8 बसेस स्वरूपातील रूग्णवाहिका अशा 12 रूग्णवाहिकांव्दारे दर दिवशी 48 वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लसीकरण करण्यात आले. यामध्ये प्रत्येक रूग्णवाहिका दर दिवशी 9 ते 11, 11 ते 1, 2 ते 4 आणि 4 ते 6 अशा वेळांमध्ये निश्चित केलेल्या ठिकाणी उभी करून नियोजनबध्द रितीने कोव्हीड लसीकरण करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत लसीकरण करताना महानगरपालिकेच्या विद्यमान 101 लसीकरण केंद्रांपासून काहीशी दूर अंतरावर असलेली ठिकाणे निवडून तेथे लसीकरणास प्राधान्य देण्यात आले. यात दुर्गम कॉरी भागातही रूग्णवाहिका नेऊन लसीकरण करण्यात आले. नागरिकांना अगदी घराजवळ कोव्हीडची लस उपलब्ध झाल्याने या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
11 ऑक्टोबरला 1335 नागरिकांनी 12 ऑक्टोबरला 1570 नागरिकांनी, 13 ऑक्टोबरला 1834 नागरिकांनी व 14 ऑक्टोबरला 2494 नागरिकांनी अशाप्रकारे 4 दिवसात 7233 नागरिकांनी ’मिशन कवच कुंडल’ मोहिमेअंतर्गत 12 रूग्णवाहिकांव्दारे 192 स्पॉटवर करण्यात आलेल्या ’लसीकरण आपल्या दारी’ उपक्रमाचा लाभ घेत ही मोहीम यशस्वी केली.
क्षेत्रानुसार लसीकरण
सीबीडी नागरी आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात 260
सेक्टर 48 नेरूळच्या क्षेत्रात 430
शिरवणेच्या क्षेत्रात 260
इंदिरानगर क्षेत्रात 480
तुर्भे क्षेत्रात 270
वाशीगाव सेक्टर 1 क्षेत्रात 160,
महापे क्षेत्रात 740
खैरणे क्षेत्रात 552
पावणे क्षेत्रात 511
राबाडे क्ष्तारात 170
करावे क्षेत्रात 160
नेरूळ 1 क्षेत्रात 248
नेरूळ 2 क्षेत्रात 134
कुकशेत क्षेत्रात 60
सानपाडा क्षेत्रात 170
जुहूगांव क्षेत्रात 568
घणसोली क्षेत्रात 550
नोसील नाका क्षेत्रात 160
कातकरीपाडा क्षेत्रात 300
ऐरोली क्षेत्रात 220
चिंचपाडा क्षेत्रात 360
दिघा क्षेत्रात 260
इलठणपाडा क्षेत्रात 210
एकूण 7234
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai