भावे नाट्यगृहात रंगणार चंद्रगीतांची मैफिल
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 22, 2021
- 604
22 ऑक्टोबरला नवी मुंबई प्रेस क्लबतर्फे आयोजन
नवी मुंबई : शासनाने करोनाचे निर्बंध शिथिल केल्यामुळे यावर्षी कोजागरी पौर्णिमेनिमित्त नवी मुंबई प्रेस क्लब तर्फे ‘उगवला चंद्र पुनवेचा’ या चंद्र गीतांवर आधारित मराठी-हिंदी गीत वाद्यवृंदाचे आयोजन 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आले आहे. ही संगीत मैफल नवी मुंबईकरांसाठी विनामुल्य आहे.
नवी मुंबई प्रेस क्लबच्या वतीने दरवर्षी कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधून शहरातील राजकीय, शासकीय, सामाजिक, सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असणार्या मान्यवरांचे कौटुंबिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येते. कोरोना आपत्तीमुळे गेल्यावर्षी कोजागरी कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकले नव्हते. यावर्षी शासनाने नाट्यगृह व चित्रपटगृहे 22 ऑक्टोबरपासून खुली केल्यामुळे कोजागरीच्या कार्यक्रमाचे आयोजन त्याचदिवशी संध्याकाळी 7 वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे करण्यात आले आहे.
उगवला चंद्र पुनवेचा...या हिंदी मराठी चंद्र गीतांच्या मैफलीचे संगीत संयोजन अजय-मदन यांचे असून कार्यक्रमाचे निवेदन अमित काकडे करणार आहेत. तर कोजागरीच्या शीतल चांदण्यात गायक चैतन्य कुलकर्णी, वृषाली पाटील, अनुराग नाईक, युक्ता पाटील, मिथिला माळी आपल्या गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहेत. या कार्यक्रमास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नवी मुंबई प्रेस क्लबतर्फे करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai