नवी मुंबईत 25 मे पासून 10% पाणी कपात
- by Aajchi Navi Mumbai
- May 22, 2026
- 18
आठवड्यातील 2 दिवस संध्याकाळचे पाणी बंद राहणार
नवी मुंबई : महापालिका क्षेत्रासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे चरण जलाशयामधील पाणीसाठ्यात दैनंदिन घट होत आहे. सदर पाणीसाठ्याचे योग्य नियेोजन व्हावे यादृृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून आणि ए-निनो व आयओडी बाबत वर्तविलेल्या अंदाजनुसार कमी मान्सूनचे प्रमाण लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सोमवार, दि. 25 मे 2026 पासून 10 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. यामध्ये आठवडयातून दोन दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे आता नवी मुंबईकरांनी पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मोरबे धरणातून व म.औ.वि. महामंडळाच्या बारवी धरणातून दैनंदिन पाणी पुरवठा करण्यात येतो. मोरबे धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 190,890 द.ल.घ.मी. इतकी असून, सद्यस्थितीत मोरबे धरणात प्रत्यक्ष 36.430 द.ल.प.मी. (19.11%) इतका उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे दैनंदिनरित्या नियमितपणे व नियोजनपूर्वक पालिकेमार्फत पाणी पुरवठा केला जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी सद्यस्थितीत पुरेसा जलसाठा उपलब्ध असून, नवी मुंबईकरांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. तथापि, वरील संभाव्य कारणे लक्षात घेता यैवर्षीसाठीची व पुढील वर्षासाठीची उपाययोजना म्हणून नवी मुंबई रपालिकेमार्फत पाण्याचे अचूक नियोजन करणे आवश्यक आहे.
नवी मुंबई क्षेत्रात व मोरबे धरण क्षेत्रात नियमित होत असलेली कमाल तापमान वाढ आणि त्या अनुषंगाने धरणाच्या पाण्याचे होणारे कमाल बाष्पीभवन यामुळे 10 टक्केपेक्षा कमी जलसाठा झालेनंतरही पाणीपुरवठा सुरळीत व नियोजनपूर्वक करणे, या सर्व बाबीचा साकल्याने विचार करता. खबरदारीचा उपाय माणून नवी मुंबई महानगरपालिकेने 10 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पाणी कपात ही मोरबे भरण क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयामधील उपयुक्त जलसाठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत लागू राहणार आहे. पालिका क्षेत्रामध्ये आठवडयातून दोन दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवून पाणी बचत करण्याचे पालिकेमार्फत नियोजित आहे. तसेच मोरबे धरणातून सिडको नोड मधील खारघर व कामोठे या सिडको क्षेत्राला सुध्दा 10 टक्के पाणीकपात लागू राहणार आहे.
सिडको नोड मधील पाणी पुरवठा दर शुक्रवारी बंद
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र आणि सिडको नोड मधील खारघर व कामोठे येथील सर्व नागरिकांना याद्वारे जाहीर आवाहन करण्यात येते की, नमूद तक्त्यानुसार आठवड््यातून दोन दिवस संध्याकाळचा पाणी पुरवता बंद राहणार असल्याने, नवी मुंबई महानगरपालिकेच्या जलस्त्रोत व पाणीपुरवठा व्यवस्थेची सातत्यपूर्ण कार्यक्षमता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करावा व नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे. असे आवाहन पालिकेने केले आहे.
पाणी पुरवठा बंद असणारे वेळापत्रक (वार)
- बेलापूर- सामवार व गुरुवार
- नेरुळ-मंगळवार व शनिवार
- तुर्भे-बुधवार व रविवार
- कोपरखैरण- गुरुवार व सोमवार
- मंगळवार व शनिवार
- घणसोली- बुधवार व रविवार
- ऐरोली- शुक्रवार (म.ओ.वि. मं. यांच्या संभाव्य गुरुवार व शुक्रवार शटडाऊन असल्यामुळे)
- दिघा- म.ओ.पि.मं.च्या शटडाऊन संभाव्य वेळापत्रकाप्रमाणे राहील
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai