Breaking News
नागरिकांची एपीएमसी मार्केटला पसंती ; सजावटीच्या वस्तूंची रेलचेल
नवी मुंबई : तोंडावर आलेल्या दिवाळी सणासाठी बाजार सजला असून खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड होत आहे. कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्याने नागरिकही मरगळ झटकून खरेदीला लागले आहेत. अनेक सजावटींच्या विविध आकर्षक वस्तूंची रेलचेल बाजारात पाहायला मिळत आहे. वाशीतील एपीएमसी मार्केटला नागरिकांनी खरेदीसाठी विशेष पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या वषी कोरोनाच्या भीतीच्या आणि तणावाच्या छायेत काढल्यानंतर यंदा प्रत्येकालाच दिवाळीसण मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे. सांयकाळी खरेदीसाठी नागरिक बाहेर पडू लागले आहेत. बाजार सजावटीच्या साहित्यांनी फुलून गेला आहे. दिवाळीचे उस्ताही वातावरण पहावयास मिळत आहे. बाजारामध्ये दिवाळीसाठी लागणारे विविध प्रकारचे आकर्षक, रंगीबेरंगी प्लास्टिकचे, कापडाचे पर्यावरणपूरक आकाशकंदील; पणत्या, विविध प्रकारच्या एलईडी विद्युत माळा, रांगोळी, तोरण इत्यादी साहित्य विक्रीसाठी मोठ्याप्रमाणात आले आहे. एलईडी दिव्यांच्या रोषणाईमुळे बाजार परिसर उजळून निघाला आहे. कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी व्यापारी सरसावले आहेत. जास्तीत जास्त ग्राहकांना आर्कषित करण्यासाठी विविध प्रकारच्या सवलती दुकांनदारांकडून दिल्या जात आहेत.
भाजणीचे पीठ, चकली मसाले, चिवडा, करंज्या-लाडू-शंकरपाळ्या बनविण्यासाठी लागणारे साहित्य आणि सुकामेवा एपीएमसीमधून खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढत चालला आहे. शहरातील इतर बाजारांमध्ये सुद्धा खरेदीसाठी सायंकाळी झुंबड उडत असल्याने कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात आहे. नागिरकांच्या तोंडावरील मास्क आता हनुवटीवर आला आहे. काहींच्यांतर हनुवटीवरुन सुद्ध मास्क गायब झाला आहे. सोशल डिस्टंसिगचे तीनतेरा वाजले आहेत. नवी मुंबईमध्ये 18 वर्षावरील नागरिकांचे 100 टक्के लसीकरण झाले असल्यामुळे थोडी बेफिकीरी वाढली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस