सिडकोकडून भूखंड आणि वाणिज्यिक गाळे उपलब्ध
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 01, 2021
- 391
दिवाळीत खरेदीची भव्य योजना
नवी मुंबई ः या वर्षीच्या दिवाळीचा गोडवा अधिक वाढवण्यासाठी सिडको महामंडळाने विविध योजनांतर्गत, नवी मुंबईच्या विविध नोडमधील सामाजिक उद्देशाचे तसेच निवासी, वाणिज्यिक, निवासी तथा वाणिज्यिक भूखंड आणि वाणिज्यिक गाळ्यांच्या विक्रीची भव्य योजना आणली आहे. या योजनेंतर्गत नवी मुंबईच्या खारघर, पनवेल, पुष्पक नगर नोडमधील भूखंड आणि नवी मुंबईतील रेल्वे स्थानक संकुलांतील व सिडकोच्या गृहनिर्माण संकुलांतील वाणिज्यिक गाळे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात सिडकोच्या सामाजिक सेवा उपक्रमांतर्गत वैद्यकीय महाविद्यालय आणि विद्यार्थी वसतिगृहासोबतच निवासी, वाणिज्यिक, निवासी तथा वाणिज्यिक वापराकरिता लहान व मध्य आकाराचे भूखंड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कोविडोत्तर काळात नवी मुंबईतील बांधकाम क्षेत्रासह अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरिता सिडकोकडून सातत्याने भूखंड विक्रीच्या योजना आणल्या जात असून, सदर योजनाही सिडकोच्या या प्रयत्नांचाच एक भाग आहे. सिडकोकडून नवी मुंबईचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध उद्देशांकरिता असलेल्या भूखंड सातत्याने विक्रीकरिता उपलब्ध करून दिले जातात. या योजनेद्वारे सिडकोने लहान व मध्यम आकारांचे भूखंड उपलब्ध करून दिले असून या भूखंडांची मालकी निर्वेध (क्लिअर टायटल) आहे. प्रचलित दरांपेक्षा या भूखंडांचे दर तुलनेने कमी असून नवी मुंबईतील सुविकसित नोडमध्ये हे भूखंड स्थित आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नवी मुंबईमध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची तर छोट्या व मध्यम विकासकांना आपल्या स्वप्नातील प्रकल्प विकसित करण्याची संधी याद्वारे उपलब्ध होणार आहे. या योजनेतील वाणिज्यिक गाळे हे नवी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी आणि सुप्रस्थापित बाजारात असल्याने व्यावसायिकांना व्यवसाय वृद्धिची व गुंतवणूकदारांना गुंतवणूकीची संधी उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.
सदर योजना या ई-निविदा व ई-लिलाव पद्धीतीने पार पडणार आहेत. या योजनांकरिता निविदाकारांची नोंदणी, अर्ज सादर करणे, अनामत रकमेचा भरणा करणे, बंद निविदा सादर करणे, ई-लिलाव प्रक्रिया व योजना पुस्तिका इ. सर्व तपशील सिडकोच्या हींींिी://शर्रीलींळेप.लळवलेळपवळर.लेा या ई-लिलाव संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
दिवाळी हा प्रकाशाचा सण म्हणून साजरा केला जातो. या वर्षीच्या दिवाळीत कोविड-19 रूपी अंध:कार दूर करून विकासाचा प्रकाश निर्माण करण्यासाठी सिडकोने भूखंड व वाणिज्यिक गाळे विक्रीची ही भव्य योजना आणली आहे. छोट्या आणि मध्यम बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांकरिता सिडकोची ही दिवाळी भेट मोलाची ठरणार आहे.
डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai