पालिकेच्या आरटी-पीसीआर लॅबचे विस्तारीकरण
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 01, 2021
- 513
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण; दिवसाला होणार 5000 आरटी-पीसीआर टेस्ट्स
नवी मुंबई ः संभाव्य तिसर्या लाटेला सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. त्यादृष्टीने अत्याधुनिक आरटी-पीसीआर टेस्टींग लॅबचे विस्तारीकरण करण्यात आले असून यापुढील काळात दिवसाला 5000 इतक्या मोठ्या प्रमाणावर आरटी-पीसीआर टेस्ट्स केल्या जाणार आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या लॅबचे लोकार्पण करण्यात आले. ही समाधानकारक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
ठाकरे रुग्णालयात स्वत:ची अद्ययावत व संपूर्ण स्वयंचलीत आरटी-पीसीआर चाचणी व निदान प्रयोगशाळा 4 ऑगस्ट 2020 रोजी आयसीएमआर शासकीय परवानगीसह केवळ 11 दिवसात कार्यान्वित करण्यात आली. कोव्हीडच्या पहिल्या व दुसर्या लाटेत या लॅबने एकही दिवस सुट्टी न घेता अथक कार्यरत राहून आपली सेवा बजावली. या लॅबमध्ये 30 ऑक्टोबरपर्यंत 6 लाख 36 हजार 73 इतक्या आरटी-पीसीआर चाचण्या नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे 38 कोटी इतक्या खर्चाची बचत झालेली आहे. या लॅबमुळे कोव्हीड चाचण्या जलद करून संसर्गीत रुग्णांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तत्परतेने उपचार सुविधा उपलब्ध करून देणे सोयीचे झाले व त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रात कोव्हीड प्रतिबंध कार्याला बळ मिळाले. महानगरपालिकेने आपल्या विद्यमान लॅबची क्षमता 2000 टेस्टने वाढवून 5000 टेस्ट्स प्रतिदिन करण्याचे नियोजन केले. त्यास सिमेन्स इंडिया लि. या उद्योग समुहाने सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आणि सव्वा दोन कोटी इतका सीएसआर निधी उपलब्ध करून दिला आणि ही नवीन अद्ययावत प्रयोगशाळा उभी राहिली. प्रतिदिन 5000 इतक्या मोठ्या प्रमाणावर आरटी-पीसीआर टेस्ट क्षमता असणारी नवी मुंबई महानगरपालिकेची ही लॅब एमएमआर क्षेत्रातील सर्वाधिक क्षमता असणारी आरटी-पीसीआर लॅब आहे.
या आरटी-पीसीआर चाचणी व निदान प्रयोगशाळेचे लोकार्पण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी त्यांनी कोव्हीड आरोग्य सुविधा निर्मितीच्या दृष्टीने रुग्णालयात उभारण्यात आलेल्या आयसीयू कक्षाचीही पाहणी केली. कोव्हीडच्या दुसर्या लाटेत सर्वच ठिकाणी जाणवलेली आयसीयू बेड्स व व्हेन्टिलेटर्सची कमतरता लक्षात घेऊन नेरुळ व ऐरोली येथील महानगरपालिका रुग्णालयात प्रत्येकी 200 आयसीयू बेड्सची सुविधा निर्माण करण्यात आली असून आता एकूण 800 पर्यंत आयसीयू बेड्स कोव्हीड रुग्णसेवेसाठी उपलब्ध होणार आहेत त्यामुळे महानगरपालिकेची आरोग्य सेवा सक्षम होत असल्याबद्दल मंत्रीमहोदयांनी आनंद व्यक्त केला. याप्रसंगी विस्तारित लॅबच्या उभारणीसाठी सीएसआर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिंदे यांनी सिमेन्स कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक अर्जुन चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे पहिल्या व दुसर्या लाटेत अथक परिश्रम घेतलेल्या नवी मुंबई महानगरपालिका आरटी-पीसीआर लॅबच्या समुहाचा विशेष सन्मानही करण्यात आला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai