जिल्ह्यातील जत्रोत्सव रद्द
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 11, 2021
- 538
अलिबाग ः कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आवास, वरसोली, चौलसह जिल्ह्यातील अन्य सर्वच जत्रा यंदादेखील होणार नाही. कोरोनाचे नियम पाळून भाविकांना मंदिरात जावून दर्शन घेता येणार आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे सलग दुसर्या वर्षीदेखील जिल्ह्यात यात्रा भरविण्यात येणार नाही. जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात नागेश्वर आवास, कनकेश्वर, वरसोली विठोबा, चौल भोवाळे येथील दत्तगुरु त्याचप्रमाणे रोहा तालुक्यातील महादेववाडी येथील महादेवाची, मुरुड तालुक्यातील दत्तात्रेय अशा अनेक यात्रा या काळात भरविण्यात येत असतात. यासर्वात साजगाव येथील यात्रा सलग 15 दिवस भरते. कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होत असल्याने यंदा जत्रा होतील अशी आशा होती. मात्र यात्रा भरणार नसल्याने सर्वच व्यवसायीक हवालदिल झाले आहेत. भाविकांना दर्शन मिळणार असल्याने भक्तांनी समाधान व्यक्त केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai