प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा 18 नोव्हेंबरपर्यंत सादर करा
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 12, 2021
- 711
निवडणुक विभागाचे महापालिकेला आदेश
नवी मुंबई ः कोरोनामुळे रखडलेली पालिका निवडणुकीसाठी तयारी सुरु झाली असून मतदार यादी कार्यक्रमही जाहीर झाला आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत प्रभााग रचनेचा कच्चा आराखडा बनविण्याच्या सूचना निवडणुक आयोगाने पालिकेला केल्या आहेत. 122 नगरसेवकांसाठी 41 प्रभाग तयार केले जाणार असून त्याच्या रचनेसाठी प्रशासनाने काम सुरु केले आहे.
नवी मुंबई पालिकेची मुदत 7 एप्रिल 2019 रोजी संपुष्टात आली. कोरोनामुळे पालिका निवडणुक दिड वर्षे पुढे ढकलली गेली आहे.त्यामुळे सध्या पालिकाचा कारभार प्रशासक म्हणून आयुक्त सांभाळत आहेत आथा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने निवडणुकीचे संकेत मिळाले आहेत. त्यानुसार निवडणुक आयोगासह पालिकाही सज्ज झाली आहे. पालिकेत आधी एक सदस्यीय प्रभाग पद्धती होती बदलून शासनाने त्रिसदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली. त्यामुळे 111 नगरसेवक गृहित धरुन निवडणुक प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र आता त्रिसद्सीय प्रभाग रचना करुन नगरसेवकांची संख्याची 122 झाली आहे. त्यामुळे 122 नगरसेवकांसाठी प्रभाग रचना करावी लागणार आहे. निवडणुक विभागाने 3 नोव्हेंबरला महानगरपालिकेला प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा बनविण्याच्या सूचना केल्या आहेत. 18 नोव्हंबरेपर्यंत हा आराखडा निवडणुक विभागास सादर करायचा आहे. प्रभाग रचनेविषयी मार्गदर्शन सूचना महापालिकेला देण्यात आल्या आहेत.
शहरात 41 प्रभाग होणार आहेत. यामध्ये 3 नगरसेवक असलेले 40 व 2 नगरसेवक असणारा एक प्रभाग असणार आहे. निवडणुक विभाग या कच्चा आराखड्यास मंजुरी देईल. यानंतर प्रारुप आराखडा बनविण्याचे काम केले जाईल. प्रारुप आराखडा जाहीर करुन नागरिकांच्या सूचना व हरकती मागविल्या जातील. त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai