उद्यानांतील कामे निकृष्ठ दर्जाची
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 18, 2021
- 464
पाहणीदौर्यात विरोधी पक्षनेत्यांची नाराजी ; अधिकार्यांना धरले धारेवर
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या समोरच असलेले महात्मा गांधी उद्यानातील सुरु असलेल्या कामांची बुधवारी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पाहणी केली. यावेळी टेंडर मधील कामानुसार आवश्यक असलेले काम निकृष्ट दर्जाचे आहे हे त्यांनी अधिकार्याच्या निदर्शनास आणून दिले. येथील कामाविषयी, सुरक्षेविषयी, स्वच्छतेविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. अधिकार्यांना धारेवर धरुन सदर कंत्राटदाराला सर्व काम नियमानुसार करून घेण्याचे निर्देश दिले आणि पुन्हा काही दिवसांनी काम झाल्यानंतर पुन्हा पाहणी दौरा करणार असल्याचे सांगितले.
उद्यानात प्रथम गेल्यानंतर प्रितम म्हात्रे यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करताना पुतळ्या भोवती जमलेले जाळे दिसले. तसेच सदर उद्यानात टेंडर मधील कामानुसार आवश्यक असलेले काम निकृष्ट दर्जाचे आहे हे त्यांनी अधिकार्यांना निदर्शनास आणून दिले. येथे लावण्यात आलेले मार्बल व्यवस्थित फिटिंग झालेले नाहीत. उद्यानामध्ये सुरक्षारक्षक असतानासुद्धा सर्व परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला निदर्शनास आला याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. तसेच त्यानंतर सदर उद्यानात कंत्राटदाराकडून टाकण्यात आलेली माती ही नियमानुसार न टाकता केवळ दिखाव्यापुरती पसरविण्यात आली आहे हे त्यांनी अधिकार्यांना दाखवले. अशा प्रकारच्या बर्याचशा त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी अधिकार्यांना सदर कंत्राटदाराला बोलावून घेऊन सर्व काम नियमानुसार करून घेण्याचे निर्देश दिले आणि पुन्हा काही दिवसांनी काम झाल्यानंतर या उद्यानाचा पाहणी दौरा करण्याचे ठरवले.
याच प्रकारे साईनगर येथे 2019 साला पासून सुरु असलेल्या गार्डन प्लॉटवरचे काम सुद्धा पाहणी करण्यासाठी तेथे गेले असता तेथे गेल्या दोन महिन्यापासून वीजपुरवठा खंडित झालेला होता. वीजपुरवठा नसल्यामुळे बोरिंगचे पाणी झाडांना टाकता येत नसल्यामुळे बरीचशी झाडे सुकली आहेत. तसेच त्या उद्यानात लहान मुलांसाठी लावण्यात आलेली खेळणी सुद्धा काही महिन्यांपूर्वी चोरी करण्यात आली आहेत. या चोरी संदर्भात सुद्धा पनवेल महानगर पालिकेने काय पाठपुरावा केला याचा जाब प्रितम म्हात्रे यांनी अधिकार्यांना विचारला. तसेच या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी नव्याने लावण्यात आलेले नागरिकांसाठी चे इ टॉयलेट बंद अवस्थेत आढळून आले. सदर उद्याना संदर्भात राहिलेल्या त्रुटी आणि आवश्यक ती कामे त्वरित पूर्ण करून सदर उद्यान नागरिकांसाठी खुले करण्याचा निर्धार यावेळी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai