मुजोर रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 20, 2021
- 392
नवी मुंबई : शहरातील जवळचे भाडे नाकारणे, मीटर नुसार रिक्षाचे भाडे न घेता प्रवाशांची अडवणूक काही मुजोर रिक्षाचालकांकडून सुरु होती. या तक्रारींत वाढ झाल्याने वाशी उप प्रादेशिक विभागाकडून गेली तीन दिवस रिक्षाचालकांवर कारवाई मोहिम हाती घेतली. यात साध्या वेशात प्रवाशी बनून आरटीओच्या अधिकार्यांनी प्रवास केला. यात रिक्षाचालकांची ही मनमानी मोठया प्रमाणात समोर आली. यामुळे वाशी व सानपाडा विभागातील 77 रिक्षा आरटीओकडून जप्त करण्यात केल्या आहेत.
शहरातील कोपरखैरणे, घणसोली, वाशी, नेरुळ, इत्यादी ठिकाणी रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा सुरू असतो. मनमानी आणि आडमुठेपणामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. कधी मनमानीपणे भाडे आकारणी तर कधी भाडे नाकारले जाते आहे. काही रिक्षाचालक तर मीटर डाऊन करिता मनमानी भाडे घेत आहेत. अशा मुजोर रिक्षा चालकांबाबत तक्रारी आल्यानंतर उप प्रादेशिक परिवहन विभागाने अचानक साध्या वेशात प्रवासी बनून या तक्रारींची पडताळणी केली. यात हा प्रकार सर्रास सुरू असल्याचे दिसून आले. तसेच गणवेश परिधान न करता रिक्षा चालवल्या जात होत्या तर अनेकांकडे परवाना नसताना वाहतूक केली जात होती. त्यामुळे आशा रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. यापुढेही अचानकपणे अशी कारवाई करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील यांनी सांगितले. मंगळवारीपासून वाशी आणि सानपाड्यातील अशा 77 रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. या रिक्षा जप्त करण्यात आल्या असून त्या रिक्षाचालकांना नोटीस बाजाविण्यात आली आहे. या नोटिसींना प्रतिसाद दिला नाही तर त्यांचे परवाने निलंबित केले जाणार असल्याची माहिती ‘आरटीओ’नी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai