सीबीडीतील बारवर छापा
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 22, 2021
- 381
नवी मुंबई : सीबीडी पोलिसांनी आपल्या हद्दीतील सेक्टर-11 येथील बिग बॉस या लेडीज बारवर गुरुवारी रात्री 11 वाजता छापा मारुन सदर बारमध्ये काम करणार्या 6 बार बाला व बारच्या मॅनेजरसह 3 वेटर्सना ताब्यात घेतले आहे. सदर बार मधील महिला या ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी अश्लील हावभाव व अंगविक्षेप करत असल्याचे आढळुन आल्याने पोलिसांनी सदरची कारवाई केली.
सीबीडी सेक्टर-11 भागात बिग बॉस नावाचे लेडीज बार असून या लेडीज बारमध्ये काम करणार्या महिलांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील हाव-भाव केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सीबीडी पोलिसांनी गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास छापा मारला. यावेळी बिग बॉस या बारमध्ये काम करणाऱया महिला ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी अश्लिल हावभाव व अंगविक्षेप करत असल्याचे आढळुन आले. तसेच बारचा मॅनेजर मनिष जाधव, वेटर रवि कुमार व सिकंदर कुमार हे तिघे बार मध्ये काम करणार्या महिलांना हातवारे करुन व टाळ्या वाजवून प्रोत्साहित करताना आढळुन आले. सदर बार उशीरापर्यंत सुरु ठेवण्यात आल्याचे आढळुन आल्याने पोलिसांनी सदर बारमध्ये काम करणार्या 6 महिलांसह बारचा मॅनेजर व वेटर अशा एकुण 9 जणांविरोधात 294 नुसार गुन्हा दाखल करुन सगळ्यांना ताब्यात घेतले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai