महापौरांनी केली पावसाळी स्थितीची पाहणी
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 08, 2026
- 26
नवी मुंबई ः पावसाळी कालावधीतील क्षेत्रीय स्तरावरील स्थितीचा प्रत्यक्ष आढावा नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी घेतला. शहाबाज बेलापूर व जुहूगाव वाशी या ठिकाणी घडलेल्या इमारत दुर्घटना स्थळांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व तेथील रहिवाशांशी संवाद साधून त्यांना दिलासा देत आवश्यक कार्यवाही तत्परतेने करण्याचे निर्देश महापालिका अधिकाऱ्यांना दिले.
सतत सुरु असणाऱ्या पावसाचा फटका नवी मुंबईतील विविध भागात बसल्याचे पाहायला मिळत आहे. झाडे पडणे, पाणी साचणे, स्लॅब पडणे अशा दुर्घटना घडल्या आहेत. शहाबाज गाव, बेलापूर आणि वाशी येथे इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या. वाशीतील दुर्घटनेत एका पादचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला. या दोन्ही ठिकाणी महापौर सुजाता पाटील यांनी प्रत्यक्ष भेट गेऊन पाहणी केली. शहाबाज येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीची पमहापालिकेने तत्परतेने स्ट्रक्चरल तपासणी करुन घ्यावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तर वाशीतील इमारतीचा सर्व पडिक भाग निष्कासित करण्याच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या त्यानुसार दुसऱ्या दिवशी सदर इमारत निष्कासीत करण्यात आली.
महापे एमआयडीसी येथील पोलीस चौकीसमोर रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी साचलेल्या ठिकाणाचीही पाहणी करत त्याठिकाणी सुरु असलेल्या जेसीबीने नाल्याचे पात्र मोठे करण्याच्या कामाला वेग दयावा असे महापौरांनी कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त भरत धांडे यांना निर्देश दिले. ठाणे बेलापूर रोडवरील स्थितीची दिघ्यापर्यंत पाहणी करत ग्रीनवर्ल्ड नाल्यातील प्रवाहाचीही महापौर सुजाता पाटील यांनी उपमहापौर दशरथ भगत यांच्यासह पाहणी केली. पाहणी दौऱ्यात तीन दिवसातील मुसळधार पावसात मोठया प्रमाणात वादळी वाऱ्यामुळे झाडे पडण्याच्या घटना सर्वत्र घडल्या असून पडलेली झाडे उचलून नेण्याचे काम जलद गतीने करावे असेही निर्देशित करण्यात आले. नवी मुंबईकर नागरिकांनी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने आत्यंतिक महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच झाडाखाली उभे राहू नये व झाडाखाली आपली वाहने उभी करु नयेत असे आवाहन करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai