स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 08, 2021
- 970
दर शनिवारी व रविवारी आयोजन
पनवेल : महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग आणि विशेषत राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणार्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत शनिवार, 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता ‘गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र’ सुरू करण्यात आले. दर शनिवारी व रविवारी हे मार्गदर्शन केंद्र सुरू असणार आहे. या मार्गदर्शन केंद्रामध्ये शासकीय सेवेत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकार्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पेण येथील भाऊसाहेब नेने कॉलेज हॉल येथे हे केंद्र सुरु होणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2 जानेवारी 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांनाही या मार्गदर्शन केंद्राचा लाभ मिळणार आहे. तसेच कोविड-19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील विद्यार्थ्यांना पेण येथील या केंद्रावर हजर राहणे शक्य नसल्यास अशा विद्यार्थ्यांसाठी ते राहत असणार्या तालुक्यातील तहसीलमध्ये दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याची सुविधा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पनवेल तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी सदरचे आयोजन शनिवार 4 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे करण्यात आले. या शिबिरात 40 जणांनी सहभाग नोंदविला. याशिवाय या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी जिल्ह्यातून अधिक प्रतिसाद मिळाल्यास जिल्ह्यात अन्य तालुक्यांमध्ये देखील अशा प्रकारचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल, असा मानस जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी व्यक्त केला आहे. तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची आणि विशेषत राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणार्या पनवेल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या केंद्रातील सुविधांचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालय, पनेवल येथे अर्ज सादर करून या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांचे वतीने विजय तळेकर, तहसिलदार पनवेल यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai