केंद्र व राज्य सरकारकडून पालिकेला 43 कोटी
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 14, 2021
- 931
स्वच्छतेमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भरघोस पारितोषिक निधी
नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेस यापूर्वीच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये राष्ट्रीय पातळीवर संपादन केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रू.30 कोटी पारितोषिक रक्कम मिळणार असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात रु.15 कोटी रक्कमेचा पारितोषिक स्वरुपातील निधी प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे माझी वसुंधरा अभियानामध्ये राज्यात व्दितीय क्रमांक संपादन केल्याबद्दल महाराष्ट्र शासनामार्फत रू. 7 कोटी पारितोषिक रक्कम आणि सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज मध्ये देशात व्दितीय क्रमांक पटकाविल्याबद्दल केंद्र सराकरामार्फत रू. 6 कोटी पारितोषिक रक्कम प्राप्त झालेली आहे. अशाप्रकारे एकूण 43 कोटी इतक्या भरघोस रक्कमेचा पारितोषिक निधी नवी मुंबई महानगरपालिकेस मिळणार आहे.
राज्यातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान कायम राखत जनसहभागातून नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच आघाडीवर राहिला आहे. स्वच्छ सर्वेक्षणात राष्ट्रीय पातळीवर सतत उंचावत राहिलेल्या या यशाबद्दल महाराष्ट्र शासनानेही नवी मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले असून येथील स्वच्छता कार्याला प्रोत्साहक पारितोषिक रक्कम प्रदान केलेली आहे. सन 2002 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान सुरू झाल्यापासून व पुढे केंद्र सरकारच्या वतीने 2016 पासून स्वच्छ भारत मिशन सुरू झाल्यानंतरही नवी मुंबई महानगरपालिकेने आपले स्वच्छतेचे मानांकन सतत उंचावत ठेवले आहे. यावर्षीही नवी मुंबई महानगरपालिकेने 10 ते 40 लक्ष लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून बहुमान पटकाविलेला असून ओडीएफ कॅटेगरीमध्ये सर्वोच्च वॉटरप्लस मानांकन, कचरामुक्त शहरांमध्ये सर्वोच्च 5 स्टार मानांकन तसेच या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या प्रेरक दौड सन्मान कॅटेगरीमध्ये सर्वोच्च दिव्य मानांकन अशी तिन्ही राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च मानांकने नवी मुंबई महानगरपालिकेने संपादन केलेली आहेत.
स्वच्छ सर्वेक्षणामधील पुरस्काराप्रमाणेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान’ यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका राज्यातील व्दितीय क्रमांकाचे शहर म्हणून पारितोषिक प्राप्त ठरलेली असून त्याचीही पारितोषिक रक्कम रु.7 कोटी महानगरपालिकेस प्राप्त झालेली आहे. याशिवाय सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस देशात व्दितीय क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले असून त्याचीही पारितोषिक रक्कम रु. 6 कोटी महानगरपालिकेस प्राप्त झालेली आहे. अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेस अभिनंदनपूर्वक रु. 43 कोटी इतकी पारितोषिक रक्कम प्राप्त झाली असून याव्यतिरिक्त यापुढील काळात आणखी पारितोषिक रक्कम प्राप्त होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका करीत असलेल्या कामाची दखल राष्ट्रीय व राज्य पातळीवर घेण्यात आली आहे. यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2022 ला सामोरे जाताना तसेच माझी वसुंधरा अभियानात आणखी वैशिष्टयपूर्ण कामे करण्यासाठी या पारितोषिक रक्कमेचा विनियोग केला जाणार आहे. यामधून शहर स्वच्छतेला अधिक गतीमानता मिळेल असा विश्वास आहे. - अभिजीत बांगर , पालिका आयुक्त
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai