पतीनेच केली पत्नीची गळा चिरुन हत्या
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 14, 2021
- 1001
माथेरानमधील हत्येप्रकरणी 24 तासांत आरोपी जेरबंद
कर्जत : माथेरानच्या इंदिरा गांधी नगरमधील एका खोलीत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. चारित्र्याच्या संशयावरून या महिलेची हत्या तिच्या पतीनेच केली असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून, रायगड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने 24 तासांच्या आरोपीला नवीन पनवेल येथून ताब्यात घेतले आहे. नवीन पनवेल येथे राहणारा तरुण रामसिलोचन पाल हा मुळचा उत्तर प्रदेशातील असून तो व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्याचे मुंबई मालाड येथे राहणार्या पूनम या तरुणीबरोबर मे 2021मध्ये लग्न झाले होते, परंतु परिचारिका म्हणून सेवेत असलेल्या पूनम या आपल्या आईवडिलांकडे मालाड येथे राहून नोकरी करीत होत्या. सुटीला नवीन पनवेल येथील घरी ते दोघे एकत्र येत असत. एकत्र राहता येत नसल्याने दोघांमध्ये चिडचिड होत होती. एकांत मिळावा म्हणून ते दोघे शनिवारी (दि. 11) सायंकाळी माथेरान येथे आले होते. त्यावेळी राम सिलोचन पाल याने साई सदन लॉजमध्ये खोटी नाव नोंदणी केली होती. त्याने तेथे रात्री पत्नी पूनमचा गळा आवळला आणि नंतर धारदार चाकूच्या सहाय्याने गळा चिरून तिचे मुंडके बाजूला केले. रामसिलोचन याने रविवारी पहाटे रूम सोडली आणि सात वाजता नेरळ येथे पोहचला. त्यावेळी त्याने इंदिरानगर भागातील सखाराम तुकाराम पॉईंट येथील दरीमध्ये पत्नी पूनमचे मुंडके आणि कपडे फेकून दिले. विवस्त्र आणि मुंडके नसलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने माथेरानमध्ये खळबळ उडाली होती. माथेरानचे सहायक पोलीस निरीक्षक संजय बांगर, उपनिरीक्षक केतन सांगळे यांच्यासह हवालदार अविनाश ठाकूर, महेंद्र राठोड, नाईक खतेले, राकेश काळे, सुनील पाटील, प्रशांत गायकवाड यांच्या पथकाने तपास सुरू केला. त्यांनी माथेरान इंदिरानगर आणि अमन लॉज तसेच दस्तुरी नाका येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात पुनमची पर्स आढळली. त्या पर्समध्ये असलेल्या चिठ्ठीमध्ये राम पाल याचा मोबाइल नंबर मिळाला. राम पालचे मोबाइल लोकेशन पाहून पोलीस पथक पनवेल येथे पोहचले. त्यांनी रविवारी रात्री साडेनऊ वाजता राम पाल याला ताब्यात घेतले आणि माथेरान येथे आणले. अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून सोमवारी (दि. 13) सकाळी माथेरान पोलिसांच्या पथकाने पूनम पाल हिचे मुंडके हस्तगत केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai