Breaking News
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात ओमायक्रोन या कोविडच्या नवीन प्रकाराचा पहिला रुग्ण वाशीतील सेक्टर 14 मध्ये आढळला आहे. ही व्यक्ती केनियाहून हैदराबादला गेली होती आणि नंतर नवी मुंबईत पोहोचली. सदर व्यक्तीवर सध्या सानपाडा येथील एमजीएम कोविड केंद्रात उपचार सुरू आहेत.
शहरात ओमायक्रोन रुग्ण आढळल्याने मनपा आरोग्य अधिक सतर्क झाले आहे. नवी मुंबईत आढळून आलेला रुग्ण हा परदेशातुन परतला आहे. हा प्रवासी केनियाहून 15 डिसेंबरला हैदराबादला पोहोचला. हैदराबाद विमानतळावर आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल 18 डिसेंबर रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यानंतर, प्रवाशाचा नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आला आणि त्याचा अहवाल 20 डिसेंबर रोजी ओमिक्रॉन प्रकाराचा पॉझिटिव्ह आला. ही व्यक्ती वाशी येथे होम आयसोलेशनमध्ये होती आणि त्याच्या अहवालाची वाट पाहत होती. त्यामुळे सदर रुग्ण हा नवी मुंबईतील पहिला ओमायक्रॉन प्रकाराचा रुग्ण आढळून आला असून त्याच्यावर सानपाडा येथिल एमजीएम कोविड केंद्रात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai