थांबायचं नाही, पण सतर्क राहुया
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 31, 2021
- 754
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नववर्षाच्या शुभेच्छा
मुंबई ः नववर्षनिमित्ताने दरवर्षी सर्वसामान्यांकडून मोठा जल्लोष केला जातो. पण कोरोनाच्या संकटामुळे या आनंदावर विरजण पडलेलं आहे. या संकटामुळे सामान्य जनता चिंतेत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना धीर देत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोकंवर काढलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यभरासाठी नवी नियमावली जारी केली आहे. कोरोनाच्या ओमायक्रोन या नव्या विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आता थांबायचं नाही, पण सतर्क राहुयात, असं मुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून म्हणाले आहेत. थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देत त्यावर आपण मात करुया. नव्या वर्षात हिच हिंमत बांधुया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो. त्यासाठी आरोग्यदायी संकल्प करुया, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
नववर्षाचे स्वागत करताना जगावर आलेल्या कोरोना संकटाचे भान राखावे. गर्दी नकोच आणि आपल्या वागण्यातून, बेफिकिरीतून संसर्ग वाढीला हातभार लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी नववर्ष प्रारंभाच्या पुर्वसंध्येला केले आहे. कितीही आव्हानं येऊ देत त्यांच्या छाताडावर उभे राहून यशाला गवसणी घालण्याची हिंमत बांधायची आहे. यातूनच आपल्याला समृद्ध महाराष्ट्र आणि पर्यायाने बलशाली भारत घडवायचा आहे. त्यासाठी नवीन वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल याकरिता मनःपूर्वक शुभेच्छा.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai