पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 08, 2022
- 635
मुंबई ः उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा आज निवडणूक आयोगाने केली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात पार पडणार आहेत. तर पंजाब गोवा, उत्तराखंड राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार आहेत. 10 मार्च रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणार्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मतदान केंद्रावर असणारे सर्व कर्मचार्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल. डिजिटल, व्हर्च्युअल पद्धतीने प्रचार करावा, असेही निवडणूक आयोगाने सांगितले. 15 जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. रात्री आठ पासून सकाळी आठपर्यंत निवडणूक प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच डोअर टू डोअर प्रचारासाठी पाच लोकांना परवानगी देण्यात आली आहे. प्रचारादरम्यान कोरोना नियमांचं पालन करणे बंधनकारक असेल.
कोरोना काळात निवडणुका घेणं आव्हानात्मक आहे. 690 विधानसभा जागांवर निवडणुका होणार आहेत. 24.9 लाख मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. 80 पेक्षा जास्त वय असणारे, दिव्यांग आणि कोरोनाबाधित असणार्यांसाठी पोस्टल बॅलेट वोटिंग असणार असेही सांगण्यात आले. पाच राज्यांच्या निवडणुकीत एकूण 18.34 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 8 कोटी 55 लाख महिला मतदार आहेत. सर्वच राज्यात महिला मतदारांची संख्या वाढली आहेत, यूपीतली वाढ सर्वाधिक 29 टक्के इतकी आहे. पाच राज्यांच्या या निवडणुकीत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज ऑनलाइन पद्धतीने दाखल करण्याचाही पर्याय आहे. हा पर्याय बंधनकारक नसेल तर ऐच्छिक आहे. प्रत्येक विधानसभा मतदार केंद्रावर महिलांसाठी महिलांद्वारे संचालित मतदान केंद्र असणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्तीसाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरची सुविधा असणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क आणि सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्यात येईल.
कोणत्या राज्यात कधी मतदान?
- उत्तर प्रदेश
- पहिला टप्पा - 10 फेब्रुवारी रोजी मतदान
- दुसरा टप्पा - 14 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
- तिसरा टप्पा - 20 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
- चौथा टप्पा - 23 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
- पाचवा टप्पा - 27फेब्रुवारी 2022
- सहावा टप्पा - 3 मार्च 2022 रोजी मतदान
- सातवा टप्पा - सात मार्च 2022 रोजी मतदान
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai