अमोनिया वायूचा टँकर पलटला
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 12, 2022
- 548
पनवेल ः जेएनपीटी महामार्गावर कळंबोली सर्कल ते डी पॉईंट दरम्यान बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास अमोनिया वायू वाहून नेणारा टँकर पलटी झाला. अपघातानंतर टँकरमधून वायू गळती झाली. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाने वायू गळतीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. कळंबोली सर्कल येथून जेएनपीटीकडे निघालेल्या टँकरने विरुद्ध दिशेने कळंबोलीकडे येणार्या मालवाहू ट्रकला धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक अडकून पडला होता. अग्निशमनच्या कर्मचार्यांनी विशेष प्रयत्न करून त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai