रायगड किल्ल्यासह जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बंद
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 12, 2022
- 1003
रायगड : कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने रायगड किल्ल्यासह जिल्ह्यातील किल्ले आणि अन्य पर्यटन स्थळे बंद करण्याचे रायगडच्या जिल्हाधिकार्यांनी मंगळवारी (11) आदेश दिले.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आली होती. त्यानंतर रायगड, कुलाबा मुरूड-जंजिरा या गडकिल्ल्यांप्रमाणेच अलिबाग, काशीद, मुरूड, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन आदी पर्यटन स्थळे पुन्हा गजबजून गेली. या परिसरात व्यवसाय करणार्या लहान मोठ्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला होता. परंतु कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागल्याने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी गड किल्ले व प्रेक्षणीय स्थळे, प्राणी संग्रहालय, वस्तू संग्रहालय पुन्हा बंद करण्याचे आदेश दिले. यामुळे प्रमुख ऐतिहासिक स्थळ असणारे रायगड किल्ला, पाचाड येथील जिजामाता वाडा व समाधी स्थळ पर्यटकांसाठी पुढील आदेश मिळेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. या बंदीबाबत रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी फलक लावण्यात आले आहेत. थंडीचा हंगाम असल्यामुळे रायगडावर पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. डिसेंबरमध्ये येथील व्यवसायिकांना पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु आता पुन्हा किल्ला बंद झाल्याने सुमारे 200 व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळले. हीच परिस्थिती रायगड जिल्ह्यातील इतर ठिकाणांची आहे. श्रीवर्धन व दिवेआगर या भागामध्ये पर्यटकांच्या स्वागतासाठी हॉटेल व होमस्टे सज्ज झाले होते. दिवेआगर मध्ये सुवर्ण गणेशाची प्रतिष्ठापना पुन्हा झाल्याने या ठिकाणी भाविकांची गर्दीही वाढू लागलेली होती. परंतु आता या ठिकाणांची गर्दी देखील कमी होणार आहे.
- कर्नाळा अभयारण्य पर्यटकांसाठी बंद
कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने पुन्हा निर्बंध लागू केल्याने पनवेलजवळील कर्नाळा अभयारण्य सोमवारपासून (ता. 10) बंद ठेवण्याचा निर्णय अभयारण्य प्रशासनाने घेतला आहे. पनवेलपासून हाकेच्या अंतरावर मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा पक्षी अभयारण्यात कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. पनवेल जवळ असल्याने शहरातील नागरिक दररोज हजेरी लावत असतात. तसेच पक्षी निरीक्षण हे या अभयारण्यातील महत्त्वाचे मुख्य आकर्षण असल्याने पर्यटकांचा नेहमी राबता येथे असतो. सद्यस्थितीत पनवेल ग्रामीण भाग आणि शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कर्नाळा अभयारण्य बंद ठेवण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai