‘हर घर दस्तक’ अंतर्गत 55 हजार नागरिकांचे लसीकरण
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 18, 2022
- 347
नवी मुंबई ः शासनाने राबविलेल्या कोव्हीड विषयक विविध उपक्रमांत नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच उत्तम कामगिरी केली असून यामध्ये एक महत्वाचा उपक्रम म्हणजे ‘हर घर दस्तक मोहीम’. या मोहीमेंतर्गत घराच्या उंबर्यापर्यंत पोहचून 11 नोव्हेंबरपासून आत्तापर्यंत 55 हजार 296 व्यक्तींचे घराजवळच लसीकरण करण्यात आले आहे. या मोहीमेची 859 सत्रे राबविण्यात आली असून 18 वर्षावरील 18481 नागरिकांना पहिला डोस तसेच 36780 नागरिकांना दुसरा डोस आणि 35 नागरिकांना प्रिकॉशन डोस अशाप्रकारे 55296 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
या उपक्रमाप्रमाणेच ‘लसीकरण आपल्या दारी’ या संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मार्केट, रेल्वे स्टेशन्स्, बस डेपो अशा मोक्याच्या ठिकाणी रुग्णवाहिका अथवा रुग्णवाहिकेत रुपांतरित केलेल्या बसेस उभ्या करुन त्या ठिकाणीही लसीकरण करण्यास 20 डिसेंबरपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. या अभिनव उपक्रमांतर्गत 623 ठिकाणी 13204 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. याशिवाय 5 रेल्वे स्टेशनवरही कोव्हीड टेस्टींग केंद्रांप्रमाणेच कोव्हीड लसीकरण केंद्रेही कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. 11 नोव्हेंबरपासून वाशी व नेरुळ, 12 नोव्हेंबरपासून घणसोली तसेच 30 नोव्हेंबरपासून ऐरोली आणि 2 डिसेंबरपासून कोपरखैरणे रेल्वे स्टेशनवर लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या 5 रेल्वे स्टेशन्सवरील 208 लसीकरण सत्रात 17831 नागरिकांनी कोव्हीड लसीकरणाचा लाभ घेतलेला आहे. 15 ते 18 वयोगटातील कुमारवयीन मुलांच्या लसीकरणामध्येही 65498 मुलांचे लसीकरण करून 89.26 टक्के इतके उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. पुढील तीन ते चार दिवसात 100 टक्के उदिदष्ट साध्य करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. 10 जानेवारीपासून सुरु झालेल्या आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे व कोमॉर्बिडिटी असणारे 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांच्याही प्रिकॉशन डोस मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अंतर्गत 2374 आरोग्यकर्मीनी, 2745 पहिल्या फळीतील कोरोना योध्दयांनी तसेच 1419 कोमॉर्बिडिटी असणार्या 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी अशा प्रकारे 5 दिवसात 6538 लाभार्थ्यांनी तिसरा म्हणजेच प्रिकॉशन डोस घेतला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai