एक फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होणार
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 27, 2022
- 585
मुंबई ः राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर आता सर्व विद्यापीठे आणि त्याच्याशी संलग्नित महाविद्यालये एक 1 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा ऑफलाईन पद्धतीने सुरू होणार आहेत. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार असून डोस न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध असेल. याबाबतचा शासन निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संमतीनंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जारी केला.
राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने सात जानेवारीपासून सर्व महाविद्यालये बंद करण्यात आली; मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयेप्रमाणे सर्व महाविद्यालये सुरू करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने गत आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी संमती दिल्यानंतर आज उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सर्व विद्यापीठे आणि त्या अंतर्गत येणारी महाविद्यालये सुरू करण्यासाठी जीआर जारी केला आहे. स्थानिक पातळीवर निर्णय विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू करताना संबंधित महापालिका, नगरपालिका किंवा जिल्हाधिकारी यांनी स्थानिक पातळीवरील कोरोनाची परिस्थितीचा विचार घेऊन निर्णय घ्यावा, असेही शासन निर्णयात म्हटले आहे. संबंधित विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर घ्यावा. त्यानुसार महाविद्यालयांना ऑफलाईन पध्दतीने सुरु करण्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना, नियमावली कार्य प्रणाली (एसओपी) देण्यात यावी असे विभागाने म्हटले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai