पालिका विद्यार्थ्यांना रायफल शुटींगचे प्रशिक्षण
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 04, 2022
- 359
नवी मुंबई ः आजच्या स्पर्धात्मक युगात जागतिक स्तरावर ऑलिम्पिक मधील खेळांना विशेष महत्व आहे. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पहिले सुवर्णपदक रायफल शुटींग (नेमबाजी) या स्पर्धेत भारताने मिळविलेले आहे. त्यामुळे रायफल शुटींग क्रीडा प्रकाराकडे युवकांचा ओढा आहे. त्यामुळे या क्रीडा प्रकारात आवड असलेल्या महानगरपालिका शाळांमधील मुलांना महापालिकेच्या वतीने रायफल शुटींगचे विशेष प्रशिक्षण देण्याची वैशिष्टयपूर्ण योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे.
यामध्ये महापालिका शाळांमधील इच्छुक मुलामुलींची या क्षेत्रातील अनुभवी संस्थेच्या माध्यमातून नैपुण्य चाचणी घेण्यात येईल. या चाचणीतून 10 मुले व 10 मुलींची अंतिम प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल. अंतिम निवड होणा-या मुलामुलींना अनुभवी प्रशिक्षकांच्या माध्यमातून तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येईल. अशाप्रकारे जागतिक स्तरावर ऑलिम्पिकमध्ये खेळला जाणार्या रायफल शुटींग खेळामध्ये महानगरपालिका शांळामधील मुलामुलींना सुध्दा आपली गुणवत्ता सिध्द करता यावी यादृष्टीने सध्या महापिालिका क्षेत्रातील उपलब्ध असलेल्या सुविधांच्या ठिकाणी तज्ज्ञ व अनुभवी प्रशिक्षकांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरी या संधीचा रायफल शुटींगमध्ये आवड असणार्या मुलामुलींनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा व पालकांनीही त्यांना यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai