अवैध थांब्यामुळे वाहतूक कोंडी
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 19, 2022
- 571
पादचार्यांना त्रास ; कायमस्वरूपी वाहतूक पोलिसाची मागणी
नवी मुंबई : वाशी सेक्टर 15 मधील प्रबोधनकार ठाकरे मार्गावर शबरी हॉटेल समोरील अवैध रिक्षा थांब्यामुळे वाहनचालकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत असून पादचार्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वाशी-कोपरखैरणे या रहदारीच्या मार्गावर वाहतूककोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलींसाकडून काही महिन्यांपूर्वी या मार्गावरील अवैध पार्किंगवर कारवाई करण्याची मोहिम सुरू केली होती. परंतू, ही मोहिम औटघटकेची ठरली. या मार्गावर पुन्हा अवैध पार्किंगचे पेव फुटले आहे. वाहनधारकांकडून वाहने कोठेही उभ्या करण्याच्या मानसिकतेमध्ये फरक पडला नाही. यामध्ये बेशिस्त रिक्षा चालकांचे प्रमाण अधिक आहे. वाशीमधील सेक्टर 10 येथील महापालिका रूग्णालयाकडे जाण्यासाठी असलेल्या प्रबोधनकार ठाकरे मार्गावर शबरी हॉटेल समोर सतत अवैध पार्किंग असते. रस्त्याच्या दुर्तफा थांबा नसतानाही अवैधपणे रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने याठिकाणी वाहनचालकांना सतत वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. वळणावर रिक्षा उभ्या केल्याने दुसर्या बाजुने येणारे वाहन दिसत नसल्याने येथे अनेकदा अपघात झाले आहेत. येथून चालताना नागरिकांना जीव मुठीत धरावा लागत आहे. परंतू, वाहतूक पोलिसांकडून ठोस कारवाई केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याठिकाणी कायम स्वरूपी वाहतूक पोलिस असावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
याठिकाणी रिक्षा चालकांकडून नेहमीच बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. या प्रकाराला विरोध केला असता रिक्षाचालक हमरी-तुमरीवर येतात. त्यामुळे वाहतूककोंडी तर होतेच पण येथून चालतानाही त्रास होत आहे. - रामदास वाव्हळ, वाहनचालक
कुठेही वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे याठिकाणी वाहतूक पोलिस तसेच वाहतूक पोलिसांची चौकी कायम स्वरूपी असणे गरजेचे बनले आहे. ठोस आणि सतत कारवाई झाली तरच बेशिस्त रिक्षा चालकांच्या वर्तुणूकीत बदल होईल. - मनीषा भोसले, रहिवाशी
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai