युगनिर्माते प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 19, 2022
- 867
नवी मुंबई ः युगनिर्माते प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी बेलापुर किल्ला येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करुन किल्यांच्या संवर्धनासाठी हातभार लावला जातो. याहीवर्षी त्यांनी 13 फेब्रुवारी रोजी बेलापुर किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.
नवी मुंबईतील एकमेव किल्ला किल्ले बेलापूर या ठिकाणी युगनिर्माते प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत 70 ते 80 एनएसएस स्वंयसेवक, न.मुं.म.पा. अधिकारी, स्वच्छता दुत, मित्रपरिवार उपस्थित होते. मोहिमेकरिता विशेष सहभाग हा सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खारघर येथील एनएसएस स्वंयसेवकांचा होता. अध्यक्ष शंकर वसमाने यांनी सर्व उपस्थितांना माझी वसुंधरेची शपथ दिली. दरम्यान किल्ले बेलापूर यास पर्यटन स्थळ म्हणून घोषित करेपर्यंत युगनिर्माते प्रतिष्ठान किल्ल्याच्या संवर्धनाकरिता काम करत राहील, असे देखील यांनी ग्वाही दिली.
सदर प्रसंगी स्वच्छता अधिकारी, न.मुं.म.पा. मिलिंद तांडेल, समाजसेविका दर्शना भोईर, समाजसेविका सरिता खैरवासया, गोवर्धनी माता सेवा मंडळ अध्यक्ष मनोज बालम, बांधिलकी प्रतिष्ठान अध्यक्ष पल्लवी निंबाळकर आदी उपस्थित होते. त्याचसोबत युगनिर्माते प्रतिष्ठान उपाध्यक्ष अक्षय चव्हाण, खजिनदार सुदर्शन कौदरे, सदस्य विशाल पिंगळे, सदस्य बसवराज नंदी, सदस्य प्रशांत शेलार, सदस्य कोमल शेलार आदी पदाधिकारी/ सदस्य उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai