विद्यार्थ्यांच्या ‘विशेष’ कलागुणांचे कौतुक
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 25, 2022
- 653
राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्थेचा 38 वा वर्धापनदिन उत्साहात
नवी मुंबई : खारघरमधील राष्ट्रीय बौद्धिक सशक्तिकरण संस्था, सिकंदराबाद संस्थेचा 38 वा वर्धापनदिन संस्थेच्या खारघर नवी मुंबई येथील भवनात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करुन उपस्थितांची दाद मिळविली.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून सोमवार, 21 फेब्रुवारीला उत्सव चौक ते चर्च दरम्यान सकाळी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने विशेष मुले, पालक, प्रशिक्षणार्थी, संस्थेचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला. प्रभातफेरीत दिव्यांगजन व सशक्तिकरण याविषयी बहुभाषिक संदेशांचे फलक मुलांनी हातात धरले होते. 22 फेबु्रवारीला संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम क्षेत्रीय केंद्रात पार पडला. संस्था प्रमुख बी.वी.रामकुमार व संस्था प्रभारी अधिकारी डॉ. रवी प्रकाश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या क्रीडा उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. अरुण बनिक, संचालक- राष्ट्रीय वाक एवं श्रवण दिव्यांगजन संस्था, मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांग विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी यांनी नृत्य, गायन, वेशभूषा आणि नाटक सादरीकरणातून आपले कलागुण दाखवले. पालकांनी सर्वांच्या सादरीकरणाला भरभरून दाद दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai