5 मार्चला आरक्षण सोडत
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 01, 2022
- 1083
नवी मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीसाठी पालिकेसह राज्य निवडणुक आयोगाने कंबर कसली असून मे पर्यंत सभागृह अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्या अनुषंगाने 5 मार्च रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आरक्षण सोडत लकी ड्रॉ द्वारे काढण्यात येणार आहे. त्यामुळे आरक्षणाकडे सर्व उमेदवारांचे लक्ष लागले असून यावर त्यांचे निवडणुकीतील भवितव्य ठरणार आहे.
नवी मुंबई पालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोग करीत आहे. ही निवडणूक एप्रिलअखेपर्यंत घेण्याचा इरादा निवडणूक आयोगाचा आहे. त्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू असून यंदाची निवडणूक ही पहिल्यांदाच बहुसदस्यीय पध्दतीने होत आहे. त्यामुळे एकूण 122 प्रभागांचे 41 बहुसदस्यीय प्रभाग तयार करण्यात आले असून त्यांची प्रभाग रचना 1 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यावर हरकती- सूचना मागवून त्यांची सूनावणी होऊन त्या अंतिम मंजूरीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. निवडणुक आयोगाने नेमलेल्या चार सदस्यीय समितीच्या मार्गदर्शनाखाली सूचनांची अमंलबजावणी करुन 2 मार्चला हा बदल राज्य निवडणुक आयोगाकडे सुपूर्द करणार आहे. त्यानंतर निवडणुक आयोगाच्यावतीने नव्या प्रभाग रचनेचे अंतिम प्रारूप आरखडा 9 मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच निवडणुकीतील महत्वाचा भाग असणार्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले असून 5 मार्च रोजी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात लकी ड्रॉ द्वारे म्हणजेच चिठ्ठी टाकून हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर केले जाणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai