पहिली प्रवेशाचे वय साडेसात वर्ष
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 03, 2022
- 684
नर्सरी प्रवेशासाठी साडेचार वर्ष वय निश्चित
नवी मुंबई ः नर्सरी ते पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी मुलांचे वय किती असावे याविषयी गेल्या वर्षांपासून सुरु असलेला घोळ आत सरकारने मिटवला आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय किती असावे, याविषयी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सुधारित परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार नर्सरी प्रवेशासाठी किमान वर्ष साडेचार वर्ष तर पहिलीच्या प्रवेशासाठी किमान वय साडे सात वर्ष निश्चित करण्यात आले आहे.
सुधारित परिपत्रकानुसार प्लेग्रुप नर्सरी आणि पहिलीत प्रवेश घेताना 31 डिसेंबर 2022 पर्यंतचे आरटीई तसंच नवी वर्षात शाळांमध्ये प्रवेशाचं वय निश्चित करण्यात आले आहे. यानुसार प्ले ग्रुप, नर्सरीसाठी 4 वर्ष 5 महिने, ज्युनिअर केजीसाठी 5 वर्ष 5 महिने, सीनिअर केजी 6 वर्ष 5 महिने आणि पहिलीसाठी 7 वर्ष 5 महिने वय आवश्यक असणार आहे. याआधी प्ले ग्रुप, नर्सरीसाठी 3 वर्ष, ज्युनिअर केजीसाठी 4 वर्ष, सीनिअर केजीसाठी 5 वर्ष आणि पहिलीसाठी 6 वर्ष वय होतं. त्यात आता बदल करण्यात आला आहे.
जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलांच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये अडचणी निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी किमान वयोमर्यादा निश्चित करण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. त्यामुळे आता शाळांना पूर्व प्राथमिकसाठी कमी-जास्त वयाचं कारण देऊन प्रवेश नाकारता येणार नाही.
प्रवेशाचा वर्ग वयोमर्यादा 31 डिसेंबर 2022 रोजीचे किमान वय
प्ले ग्रुप / नर्सरी 1 जुलै 2018 - 31 डिसेंबर 2019 4 वर्षे 5 महिने 30 दिवस
ज्युनियर केजी 1 जुलै 2017 - 31 डिसेंबर 2018 5 वर्षे 5 महिने 30 दिवस
सिनियर केजी 1 जुलै 2016 - 31 डिसेंबर 2017 6 वर्षे 5 महिने 30 दिवस
इयत्ता 1ली 1 जुलै 2015 - 31 डिसेंबर 2016 7 वर्षे 5 महिने 30 दिवस
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai