महामार्गावर लहानग्यांचा जीवघेणा खेळ
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 05, 2022
- 644
भिकार्यांवरील कारवाईकडे प्रशासनाचे दुलर्क्ष; अपघाताची शक्यता
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर सानपाडा येथे पुलाखाली आसरा घेतलेल्या भिकार्यांच्या लहान मुलांकडून महामार्गावर राजरोसपणे खेळ सुरू आहेत. त्यामुळे याठिकाणी अपघाताची शक्यता वाढली असून याकडे संबंधित यंत्रणेचे दुलर्क्ष झाल्याचे पहावयास मिळत आहे.
करोडों रूपये खर्च करून सायन-पनवेल महामार्गाचे विस्तारीकरण करण्यात आले. सिमेंट काँक्रीटच्या या महामार्गावर अनेक ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले. वाहतूक सुरळित राहण्यासाठी जरी या पुलांचा उपयोग होत असला तरी सानपाडा येथील उड्डाणपूलाखाली मात्र भिकार्यांनी आसरा घेतला आहे. अनेकदा कारवाई करून सुद्धा भिकार्यांच्या दादागिरीमुळे ही जागा खाली करण्यास प्रशासनाला यश आले नाही. त्यामुळे याठिकाणी त्यांचा बिनधास्त वावर वाढला असून त्याचा त्रास मात्र वाहनचालकांना होत आहे. महामार्गावर येणार्या भरधाव गाड्यांची तमा न बाळगता तेथील लहान मुलांकडून या ठिकाणी टायर चालवणे, पकडा-पकडी खेळणे, अधिकची भीक मिळण्यासाठी आपापसात लागलेल्या पैजेपोटी होणारी धावाधाव तसेच पैसे न दिल्यास वाहनचालकास वाकुल्या दाखविणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. या सर्व प्रकारांकडे महापालिका प्रशासन, पोलिस प्रशासन तसेच महामार्ग प्राधिकरणाकडून दुर्लक्ष केले जात आहे. सिग्नल सुटल्यावर गाड्या भरधाव येत असतात. थोडा मोकळा रस्ता दिसताच ही लहान मुले पुन्हा खेळू लागतात. महामार्गावर खेळणार्या या लहान मुलांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने अपघाताची शक्यता वाढली असून संबंधित यंत्रणा कारवाईसाठी कशाची वाट पाहत आहे, असा सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai