लेटलतीफ 191 कर्मचार्यांचे वेतन कपात
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 23, 2022
- 511
नवी मुंबई ः महानगरपालिका कर्मचार्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या धर्तीवर 5 दिवसांचा आठवडा 26 फेब्रुवारी 2020 रोजीच्या महापालिका प्रशासन विभागाच्या परिपत्रकान्वये लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन कामकाजाची वेळ पाळणे अधिकारी, कर्मचारी यांना बंधनकारक आहे. त्यामध्ये जे अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन कामकाजाची वेळ पाळणार नाहीत त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करणेबाबत निर्देशित करण्यात आले होते. आयुक्तांनी तीन दिवस अचानक घेतलेल्या उपस्थिती आढाव्यात 191 कर्मचारी उशीरा येत असल्याचे आढळले. त्यांच्यावर वेतन कपातीची कारवाई करण्यात आली.
पाच दिवसांच्या आठवड्यात सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.45 वा ते सायं. 6.15 वा. अशी आहे. त्यातही शिपाई संवर्गाकरिता ही वेळ सकाळी 9.30 वा. ते सायं. 6.30 वा. अशी आहे. कार्यालयीन कामकाजाची ही वेळ पाळणे सर्व महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना बंधनकारक आहे. तथापि अनेक अधिकारी, कर्मचारी हे कार्यालयीन वेळेचे बंधन पाळत नाहीत व त्यामुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून आयुक्तांकडे प्राप्त होत होत्या. या अनुषंगाने कार्यालयीन शिस्तीचे पालन करणेविषयी आयुक्तांच्या निर्देशानुसार प्रशासन विभागामार्फत परिपत्रकही निर्गमित करण्यात आले होते. त्यामध्ये जे अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन कामकाजाची वेळ पाळणार नाहीत त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करणेबाबत निर्देशित करण्यात आले होते. याबाबत स्वतः आयुक्तांनी 27 ऑक्टोबर 2021 रोजी सर्व विभागांतील कार्यालयीन उपस्थितीचा आढावा घेऊन जे अधिकारी, कर्मचारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नसलेबाबत आढळून आले आहे त्यांना विभाग स्तरावर ज्ञापन बजावून त्यांचा खुलासा घेणे आणि सदर खुलासा असमाधानकारक आढळल्यास त्यांच्याविरोधात शिस्तभंग विषयक कार्यवाही प्रस्तावित करणेबाबत निर्देशित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे विभागप्रमुख, कार्यालयप्रमुख यांनी अधिनस्त अधिकारी, कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहतील याची खबरदारी घ्यावी असेही सूचित करण्यात आले होते. असे परिपत्रकाद्वारे अवगत केले असतानाही 17 फेब्रुवारी 2022 आणि 24 फेब्रुवारी 2022 रोजी उपस्थितीबाबत अचानक घेण्यात आलेल्या आढाव्यात बहुतांश कर्मचारी पुनःश्च उशीरा येत असल्याचे आढळून आले. अशाप्रकारे कार्यालयीन कामकाजाचे गांभीर्य न बाळगता कर्तव्यात कसूर करणार्या कर्मचार्यांविरोधात कारवाई करणेकरिता वरील नमूद 3 दिवस करण्यात आलेल्या अचानक पाहणीपैकी 1 दिवस उशीरा येणार्या 165 अधिकारी, कर्मचारी यांचे 1 दिवसाचे वेतन/मानधन कपात, 2 दिवस उशीरा येणार्या 22 कर्मचार्यांचे 2 दिवसांचे वेतन/मानधन कपात करण्यात आले असून याबाबत त्यांच्या सेवा पुस्तकात लाल शाईने नोंद घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 3 दिवस उशीरा येणार्या 4 कर्मचार्यांचे 3 दिवसांचे वेतन/मानधन कपात करण्यात आले आहे शिवाय या चारही कर्मचार्यांची बदली करण्यात आली आहे तसेच त्यामधील महापालिका आस्थापनेवर असलेल्या 3 कर्मचार्यांची कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai