प्रवीण दरेकरांच्या राजीनाम्यासाठी आपचे आंदोलन
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 31, 2022
- 1135
मुंबई : मुंबै बँकेतील घोटाळा प्रकरणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आम आदमी पक्षाकडून बुधवारी मुंबईत आंदोलन करण्यात आले. नरिमन पॉईंट येथील भाजपच्या कार्यालयावर आपच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण दरेकर आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजपाविरुद्ध आपने दाखवलेल्या हिम्मतीचे स्वागत अनेक तरुण कार्यकर्त्यांनी केले आहे. मात्र, पोलिसांनी आपच्या कार्यकर्त्यांना अगोदरच ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.
मुंबई महापालिकेच्या येवू घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आम आदमी पक्षाने मुंबईत आपले हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. सर्वप्रथम आपचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या मुंबै बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी राजीनाम्याची मागणी केली. यावेळी दरेकरांनी मुंबै बँकेची निवडणुक लढवण्यासाठी मजुर असल्याचा खोटा दावा करुन मुंबईकरांची फसवणुक केल्याचा आरोप केला. त्यांना विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सांगत त्यांनी दरेकरांच्या राजीनाम्यासाठी बुधवारी मुंबईत आंदोलन करुन भाजपच्या कार्यालयावर मोर्चा काढला. ‘आप’चे धनंजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. धनंजय शिंदे आणि इतर कार्यकर्ते रस्त्यावर आडवे पडून प्रवीण दरेकर यांच्याविरोधात घोषणा देत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना सरळ उचलून गाडीत टाकले. पोलिसांनी दमनशाहीने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबै बँकेतील 19 संचालकांच्या हकालपट्टीची मागणी त्यांनी केली.
- चर्चेत राहण्यासाठी हे आंदोलन-दरेकर
‘आप’च्या आंदोलनाला अर्थ नसल्याची प्रतिक्रिया दरेकरांनी दिली आहे. आपच्या नेत्यांना कसलीच माहिती नाही. धनंजय शिंदे मुंबै बँकेत 2000 कोटींचा घोटाळा झाल्याचे सांगतात. पण मुंबै बँकेचा नफा 15 कोटी रुपये इतकाच असताना एवढा मोठा घोटाळा कसा होऊ शकतो, असा सवाल त्यांनी विचारला आहे. केवळ चर्चेत राहण्यासाठी हे आंदोलन केले जात असल्याची टीका दरेकरांनी केली. - आपचा ताप
राज्यात प्रथमच भ्रष्टाचारावरुन भाजपच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचे धाडस आपने दाखवल्याबद्दल तरुणांमध्ये आपचे आकर्षण वाढत असल्याचे दिसत आहे. एकीकडे तीन पक्षांची महाविकास आघाडी भाजपपुढे गलितगात्र दिसत असताना आपचे कार्यकर्ते मात्र निडर मनाने भाजपला आव्हान देत असल्याने आप भ्रष्टाचाराबाबत चीड असणार्या तरुणांना आपल्याकडे निश्चितच आकर्षित करेल असे बोलले जात आहे. महाविकास आघाडीतील घराणेशाहीमुळे कंटाळलेल्या तरुणांना आप हा निश्चितच पर्याय असेल अशी चर्चा आहे. त्यामुळे येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत आप कोणाचा ताप वाढवतो हे पाहणे औचित्याचे ठरेल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai