सुरक्षा ठेवीचे अतिरिक्त बील
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 23, 2022
- 587
नवी मुंबई ः मार्च महिन्याच्या वीज बीलांसोबत महावितरणच्या लाखो ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बील देण्यात आली आहेत. सुमारे 8 हजार कोटी ग्राहकांच्या खिशातून वसूल केले जातील असा अंदाज आहे. ग्राहकांत यामुळे नाराजी पसरली आहे. सहा महिन्यात ही सुरक्षा ठेव हप्त्यात भरायची आहे. कंपनीने पाठवलेल्या बीलांत याचा कसलाच उल्लेख नाही.
महावितरणने भर उन्हाळ्यात ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा शॅाक दिला आहे. ग्राहकांना सध्याच्या एका महिन्याच्या सरासरी बिलाऐवजी दोन महिन्यांच्या सरासरी बिलांची रक्कम महावितरणकडे जमा करावी लागणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कंपनीने वीजपुरवठा सेवेच्या सुधारित तरतुदी राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केल्या. वीजबिल भरण्यास 21 दिवसांची मुदत दिली जाते. त्यानंतर बिल न भरल्यास 15 दिवसांची नोटिस द्यावी लागते. यासाठी एका महिन्याहून जास्त कालावधी लागत असल्याने दोन महिन्यांच्या सरासरी बिलाएवढी सुरक्षा रक्कम जमा करण्याचे ठरले होते. बिलांच्या सरासरीचे गणित तयार केले गेले आहे. गेल्या वर्षी त्याच महिन्यातील वीजबिल किंवा गेल्या तीन महिन्यांमधील वीजबिल यापैकी जास्त असलेले बिल सरासरी म्हणून काढली गेली आहे. याच्या दुप्पट रक्कम सुरक्षा ठेव ठेवायची आहे. काही ग्राहकांना दहा हजारांच्या पुढे पैसे जमा करावे लागतील.
- सुरक्षा ठेवीची नियमावली का बदलण्यात आली?
रीडिंग घेण्यापासून ते देयके येईपर्यंत दोन महिन्याचा कालावधी निघून जातो. त्यानंतर अनेक ग्राहकाकडून विलंबाने देयके भरतात. म्हणून एका ऐवजी दोन महिन्याची सुरक्षा ठेव घेण्याचा प्रस्ताव आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक घरगुती वीज वापर ग्राहकाला दोन महिन्याची सुरक्षा ठेव या महिन्यात भरावी लागेल. सुरक्षा ठेव रक्कम 17 मे पूर्वी भरायची आहेत. - रक्कम मोठी असल्यास ती एकरकमी भरणे अनेक ग्राहकांना शक्य होणार नाही. अशा ग्राहकांनी स्थानिक उपविभागीय वा विभागीय कार्यालयाकडे मागणी केल्यास सहा मासिक हप्त्यांत रक्कम भरण्यासाठी मंजुरी मिळू शकते. ज्यांना आवश्यक असेल त्यांनी या तरतुदीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai