मिठागराच्या भूमिवर सिडकोचे अतिक्रमण?
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 29, 2022
- 868
ठाणे जिल्हाधिकार्यांना अहवाल सादर करण्याचे पर्यावरण विभागाचे आदेश
नवी मुंबई ः नेरूळ सेक्टर 60 मधील पॉकेट डी आणि इ ब्लॉक मध्ये सिडकोने दिलेली बांधकाम परवानगी पुन्हा वादात सापडली आहे. सर्वे नंबर 265 हा सातबारा नोंदीप्रमाणे आजही मिठागर विभागाच्या नावावर असून तो सीआरझेड-1 मध्ये मोडत असल्याने संबंधित भूखंडावर दिलेली बांधकाम परवानगी ही अनधिकृत असल्याचे निरीक्षण पर्यावरण विभागाने नोंदवले आहे. या विभागाचे अध्यक्ष नरेन्द्र ठोके यांनी जिल्हाधिकारी ठाणे यांना सिडकोच्या अतिक्रमणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने नेरुळ येथे विकसित होणारा गोल्फ कोर्स चौकशीच्या रडारवर आला आहे.
नेरूळ सेक्टर 60 येथे सिडकोने प्रस्तावित केलेला गोल्फ कोर्स सुरवातीपासूनच वादाच्या भोवर्यात सापडला आहे. 2003 पासून निविदा प्रक्रियेतील स्पर्धकांच्या भांडणात अडकलेला हा गोल्फ कोर्स नंतर पर्यावरण प्रेमींनी घेतलेल्या आक्षेपांच्या गर्तेत सापडला. एनआरआय, दिल्ली पब्लिक स्कुल, चाणक्य, पाणजे आणि न्हावाशेवा बाजूचे क्षेत्र हे स्थलांतरित होणार्या पक्षांचे निवासस्थान असून त्याचे संरक्षण व्हावे म्हणून पर्यावरण प्रेमींनी मोठा लढा या संदर्भात उभारला आहे. यासाठी नवी मुंबई पर्यावरण ग्रुपने मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. पर्यावरण तज्ज्ञ सुनील अगरवाल यांच्यानुसार सिडकोने दिलेली बांधकाम परवानगी हि पक्षांच्या निवास्थानाला बाधित करणारी असल्याने गोल्फ कोर्स रद्द करण्याची शिफारस राज्याच्या पर्यावरण विभागाने केली आहे.
गोल्फ कोर्स बांधून पूर्ण झाल्यानंतर येणार्या खर्चापोटी पॉकेट डी आणि ई येथील 27 हजार चौरस मीटरच्या भूखंडावर निवासी-व्यापारी संकुल बांधून त्याच्या विक्रीतून गोल्फ कोर्सचा खर्च वसूल करण्याची अट निविदेत होती. परंतु गेली अनेक वर्ष न्यायालयीन लढाईत अडकल्याने गोल्फ कोर्सेच्या प्रवर्तकांना सिडकोने निविदेतील अटींना बगल देत सुधारित करारनामा करून देऊन बांधकाम परवानगी दिली. या परवानगी विरोधात पर्यावरण तज्ज्ञ सुनील अगरवाल यांनी आक्षेप घेतल्यावर पर्यावरण विभागाने नेरुळ येथील प्रस्थावित गोल्फ कोर्सचे बांधकाम रद्द करण्याची शिफारस अहवालात केल्याचे सांगितले. जर गोल्फ कोर्सच होणार नसेल तर पॉकेट डी आणि ई भागात टोलेजंग इमारती बांधण्याचा निर्णय निकाली निघतो असे अगरवाल यांचे म्हणणे आहे. या आक्षेपांची दाखल घेत नेरुळ सेक्टर 60 मधील पॉकेट डी-ई चे संपूर्ण क्षेत्र हे सर्वे नं. 265 मध्ये असून या जमिनीची मालकी मिठागर विभागाची असल्याने हे बांधकाम सीआरझेड-1 विभागात मोडत असल्याने सदर बांधकाम बेकायदेशीर असल्याचे सांगत ठाणे जिल्हाधिकार्यांना याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरण विभागाच्या या आदेशामुळे सिडकोने मिठागर विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केले का ? हा प्रश्न उपस्थित होत असून जिल्हाधिकार्यांच्या अहवालानंतरच त्यावर भाष्य करू असे सिडकोच्या पणन विभागातर्फे सांगण्यात आले.
राज्याच्या पर्यावरण विभागाने नेरूळ येथील 35.55 एकर जमिनीवर उभा राहणारा गोल्फ कोर्स पक्षांच्या निवासाकरिता हानिकारक असल्याने रद्द करण्याची शिफारस केली आहे. पर्यावरण विभागाने शिफारस केल्यामुळे पॉकेट डी आणि इ मध्ये बांधकामास दिलेली परवानगी स्थगित करणे गरजेचे आहे. जर गोल्फ कोर्सच निर्माण होणार नसेल तर निवासी-वाणिज्य संकूल बांधण्याचा प्रस्ताव निकाली निघतो. - सुनिल अगरवाल, पर्यावरण तज्ञ
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai