नेरुळमध्ये फ्लेमिंगो महोत्सव
- by Aajchi Navi Mumbai
- May 13, 2022
- 707
14 मे रोजी पक्षी निरीक्षणाची संधी उपलब्ध
नवी मुंबई : ‘फ्लेमिंगो शहर’ अशी नवी मुंबईची ओळख होत असताना शहरातील पाणथळे आणि स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास धोक्यात येत आहे. त्यामुळे या प्रमुख समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील पर्यावरणप्रेमी एकत्र आले असून त्यांनी जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाचे औचित्य साधून फ्लेमिंगो महोत्सवाचे आयोजन केले आहे.
फ्लेमिंगो पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम नेरुळ सीवूड्स येथील दिल्ली पब्लिक शाळेच्या प्रवेशद्वार क्रमांक पाच येथील सभागृहात 14 मे रोजी दुपारी 12 ते संध्याकाळी 6 दरम्यान पक्षी निरीक्षणाची संधी पक्षीप्रेमींना मिळणार आहे. महोत्सव सर्वासाठी मोफत असणार आहे. यात पक्षी छायाचित्र प्रदर्शन, कांदळवन आणि पाणथळावर आधारित देखावे, फ्लेमिंगो नृत्य आणि कला असे कार्यक्रम होणार असल्याची माहिती खारघर वेटलँड अँड हिल्स फोरमच्या ज्योती नाडकर्णी यांनी दिली. जैवविविधतेच्या दृष्टीने पाणथळ आणि दलदलीच्या प्रदेशांचे संवर्धन करण्याची आवश्यकता असल्याचे स्मरण या महोत्सवाच्या निमित्ताने होणार असल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले.
डब्ल्यूएमबीडीच्या वतीने वर्षांतून दोन वेळा स्थलांतरित पक्ष्यांबाबत जनजागृती अभियान राबवण्यात येते. स्थलांतरित पक्षी आणि त्यांच्या अधिवासांचे संवर्धन करणे हा या अभियानाचा उद्देश असतो. जगभरातील स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास सध्या धोक्यात आहेत. या स्थलांतरित पक्ष्यांना असलेला धोका कमी करण्यासाठी, त्यांचे परिसंस्थेतील महत्त्व अधोरेखित करणे आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज या दृष्टीने हे अभियान महत्त्वाचे असते. याचा एक भाग म्हणून नवी मुंबईत फ्लो मिंगो महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सुमारे 139 वर्षांपासून निसर्ग संशोधनात कार्यरत असलेली बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस), नवी मुंबई महानगर पालिका, महाराष्ट्र मँग्रोव्ह फाऊंडेशन, गोदरेज मँग्रोव्ह फाऊंडेशन, बाह्य उपक्रम संघटना वँडिरग सोल्स, निकॉन आणि दिल्ली पब्लिक स्कूल यांनी या कार्यक्रमाला पाठबळ दिले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai