क्रेडाईचे मेगा प्रॉपर्टी प्रदर्शन
- by Aajchi Navi Mumbai
- May 13, 2022
- 600
नवी मुंबई ः क्रेडाई आणि बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबई (बीएएनएम) यांच्या वतीने 20 वे मेगा प्रॉपर्टी प्रदर्शनाचे 13 ते 16 मे 2022 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. हे प्रॉपर्टी प्रदर्शन वाशी रेल्वे स्थानक जवळील सिडको एक्झिब्युशन सेंंटरच्या बाजुला असणार्या भूखंड क्रमांक 11 ते 14 वर भरले आहे.
या प्रदर्शनात नवी मुंबईतील 20 लाख रुपयांपासून ते 10 कोटी रुपये किंमत असणार्या सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर दोन वर्षाच्या कालावधीनंतर सदरचे प्रदर्शन होत असून या प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आयोजकांना आहे. या प्रॉपर्टी प्रदर्शनात एकाच छताखाली जवळपास 100 हुन अधिक बांधकाम व्यावसायिकांचे स्टॉल आहेत. त्यामुळे नवी मुंबईत घर घेणार्यांसाठी या प्रदर्शनाद्वारे पर्याय उपलब्ध होणार आहे. मुंबईतील घरांच्या किंमतीच्या तुलनेत नवी मुंबईत सर्वसामान्यांना किफायतशीर आणि परवडणारी घरे खरेदी करता येणे यामुळे शक्य होणार आहे. तसेच येणार्या ग्राहकांना विकासकांशी वन टू वन चर्चा करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय घरे विकत घेणार्या ग्राहकांना वित्तीय सहाय्य अथवा कर्जाशी संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी काही वित्तीय संस्था, बँका यांचा देखील या प्रदर्शनात सहभाग असणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai