कर भरण्यासाठी सदस्यांना 31 मे ची मुदत
- by Aajchi Navi Mumbai
- May 21, 2022
- 847
पनवेल : मालमत्ता कर न भरणार्या पनवेल महापालिकेच्या नगरसेवकांना कर भरण्याच्या नोटीसा पालिका प्रशासनाने पाठवल्या होत्या. याची मुदत 31 मे पर्यंत आहे. काहींनी कर भरला आहे. मात्र काहींनी अद्याप कर भरणा केलेला नाही. नोटीस दिल्यापासून तीन महिन्यांपर्यंत थकीत मालमत्ता कर न भरल्यास महापालिका अधिनियमाप्रमाणे विद्यमान पालिका सदस्य भविष्यातील निवडणूक लढवू शकणार नाहीत, असा नियम आहे.
पनवेल पालिकेने थकीत मालमत्ता करासह कर वसुली सुरू केली आहे. मात्र याला विरोध होत असून कर भरण्यास मालमत्ताधारक पुढे येत नसल्याचे चित्र आहे. मालमत्ता करातून गेल्या दोन वर्षांत 675 कोटी रुपयांची अपेक्षा होती. मात्र 80 कोटी रुपयांपेक्षा अधिक कर वसूल होऊ शकला नाही. कर न भरणार्यात विद्यमान नगरसेवकांचाही समावेश आहे. नगरसेवकच कर भरणार नसतील तर सामान्य कसे भरतील असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यामुळे पालिका प्रशासनाने कर न भरणार्या नगरसेवकांना कर भरण्याच्या नोटिसा पाठवल्या होत्या. फेब्रुवारी महिन्यात या विशेष नोटीस पाठवण्यात आल्या. यानंतर अनेक सदस्यांनी त्यांचा कर भरला आहे. ग्रामीण भागातील पालिका सदस्यांना कराची देयके न मिळाल्याने त्यांनी कर भरण्याचा मुद्दा चर्चेत आलाच नाही. पालिका आयुक्तांनी दिलेल्या नोटिशीचा काळ 31 मे रोजी संपणार आहे. मालमत्ता कराचा भरणा न करणार्यांना पालिकेची निवडणूक लढविता येत नसल्याची तरतूद आहे. त्यामुळे पालिकेचा करच भरला नाही तर पालिकेत नागरिकांचे नेतृत्व करण्याची संधी कशी मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai