वाशीतील जलतरणपटूंनी पटकाविले विजेतेपद
- by Aajchi Navi Mumbai
- May 21, 2022
- 748
जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड
नवी मुंबई : ऑल्मपिक स्पोर्टस् सेंटर, पलावा, डोंबिवली येथे ठाणे जिल्हा जलतरण संघटनेतर्फे नुकतेच 14 मे व 15 मे 2022 रोजी जिल्हा अजिंक्य पद स्पर्धा व राज्यस्तरीय निवड चाचणी जलतरण स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये वाशीतील फादर ग्नेल स्पोर्टस् सेंटरने विजेतेपद तर ठाणे कल्बने उपविजेतेपद पटकाविले.
सब ज्युनिअर, ज्युनिअर वयोगटातील जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये फादर ग्नेल स्पोर्टस् सेंटर, ठाणे क्लब, नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन, रूपाली रेपाळे स्विमिंग काडमी, डॉल्फिन क्लब, डोबिंवली जिमखाना, वेव मास्टर, चॅम्पियन क्लब, मारोतराव शिंदे जलतरण तलाव व रिजेन्सी क्लबमधील जलतरणपटूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. 17 वर्षे ते 11 वर्षे वयोगटामध्ये फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक, बटर फ्लाय, ब्रिस्ट स्टोक, सांघिक मिडले, वैयक्तिक मिडले या प्रकारांमध्ये स्पर्धा खेळविल्या गेल्या. यावेळी बालेवाडी, पुणे येथे जूनमध्ये होणार्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला. या स्पर्धेला टीडीएसएचे अध्यक्ष सुनिता जैन, सेक्रेटरी संतोष पाटील, उपाध्यक्ष गोकुळ कामत, उमेश उतेकर, राजेश गावडे, संकेत सावंत, किरण फाटक व रूपाली रेपाळे उपस्थित होते.
वैयक्तिक विजेतेपद
17 वर्षे वयोगट मुले : रिषभ दास मुली : अमरीता कुमार
14 वर्षे वयोगट मुले : शुभम जोशी मुली : राघवी रामानुजन
11 वर्षे वयोगट मुले : तोशल भिरूड मुली : अमिता कुडवा
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai