सावधान ! गाडीवरील चायनिज खाताय....

मुंबईतील चायनीज गाड्यांवरील चिकन रोगटलेल्या कोंबड्यांचे

मुंबई : मुंबईतील चायनीज गाड्यांवर मिळणार चिकण हे मेलेल्या कोंबड्यांच असल्याचं अन्न व औषध प्रशासन विभागाने मारलेल्या छाप्यातून निष्पन्न झालं आहे. शिवडी एक झोपडीतुन चालणार्‍या या धंद्यातुन 40 ते 50 किलो चिकन जप्त करण्यात आले आहे.

या झोपडीत विकत असलेले सगळे पदार्थ हे मेलेल्या कोंबड्यांपासून बनवले जात होते. खरंतर हा गिर्‍हाईकाच्या आरोग्याची आणि त्यांच्या जीवाशी केलेला खेळ आहे. या प्रकरणात 1 जनाविरोधात कारवाही करण्यात आली आहे.  दुपारनंतर मुंबई शहरात चायनीज पदार्थ विकणार्‍या गाड्या रस्त्यावर लागतात. स्वस्त, मस्त आणि चटकदार म्हणून अनेकांचे पाय या गाड्यांकडे वळतात. पण या ठिकाणी वापरण्यात येणार चिकन हे खाण्यायोग्य असतं का याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आजूबाजूचा परिसर स्वच्छ आहे का, बसण्याची जागा आणि पदार्थ स्वच्छ जागी बनवले जातात का याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

मुंबईत रोज हजारो कोंबड्या मुंबई बाहेरून विक्रीस आणल्या जातात. या दरम्यान ज्या कोंबड्या रोगट असतात त्या मरतात. आणि त्याच कोंबड्या शिवडी येथील एका झोपडपट्टीत विकल्या जातात. तेथे त्या कापून कमी किमतीत म्हणजे 25 ते 30 रुपये किलोने विकल्या जातात. अन्न आणि औषध प्रशासनाणे कारवाई केली असून या विषजन्न चिकन शरीरास अपायकारक असल्याने अश्या गाड्यांवरील चिकन न खाण्याच आवाहन या विभागान केले आहे.