53 पोलीसांनी घेतला प्रिकॉशन डोस
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 07, 2022
- 819
नवी मुंबई ः केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 10 जानेवारीपासून आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच सहव्याधी असणारे 60 वर्षावरील नागरिक यांना प्रिकॉशन डोस देण्यास सुरूवात झालेली आहे. यामध्ये आत्तापर्यंत 69,835 नागरिकांनी प्रिकॉशन डोस घेतलेला असून 100 टक्के उद्दिष्टपूर्तीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत.
या अनुषंगाने पहिल्या फळीतील कोरोना योध्दे म्हणून महत्वाची कामगिरी बजावलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी दुसरा डोस घेतल्यानंतर 9 महिन्यांनी घ्यावयाचा तिसरा डोस अर्थात प्रिकॉशन डोस विहित कालावधीत घ्यावा यादृष्टीने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 53 पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी प्रिकॉशन डोस तसेच एका पोलीस कर्मचार्याने कोव्हीड लसीचा दुसरा डोस घेतला. आत्तापर्यंत 13 लाख 75 हजार 11 नागरिकांनी पहिला डोस, 12 लाख 27 हजार 694 नागरिकांनी दुसरा डोस तसेच 69 हजार 835 नागरिकांनी तिसरा म्हणजेच प्रिकॉशन डोस घेतलेला आहे. शासनाने दिलेल्या उद्दिष्टानुसार लोकसंख्येच्या तुलनेत कोव्हीड लसीकरणामध्ये पहिल्या व दुसर्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यात नवी मुंबई नंबर वन शहर ठरले. तसेच 15 ते 18 आणि 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या प्रमाणातही नवी मुंबई आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे तिसर्या प्रिकॉशन डोसकडेही प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. लसीकरणाव्दारे कोव्हीडचा प्रकृतीवर होणारा परिणाम कमी होण्यास मदत होते हे लक्षात घेऊन विहित वेळेत प्रिकॉशन डोस घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai