वाशीतील वृक्षतोडीला सेनेचे मुकसमर्थन?
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 24, 2022
- 668
हजारहुन अधिक सूचना व हरकती
नवी मुंबई ः महात्मा फुले जंक्शन ते कोपरी सिग्नल पर्यतच्या उड्डाणपुलाच्या बांधकामात अडथळा ठरणारी 391 झाडे तोडण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या निर्णयाबाबत वृक्ष प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींवर सूचना व हरकतींचा पाऊस पडला आहे. यामध्ये शिवसेना सोडून सर्वच पक्षांनी आपल्या हरकती नोंदवल्याने सेनेची याला मुकसंमती आहे काय? असा प्रश्न नवी मुंबईकरांना पडला आहे.
अरेंजा जंक्शन येथे 351 कोटी रुपये खर्च करुन उड्डाणपुल बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी 391 झाडे तोडण्याचा निर्णय महापालिकेेने जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्यावर ही झाडे वाचविण्यासाठी मोठे आंदोलन आमदार गणेश नाईक व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. या आंदोलनाच्या माध्यमातून मोठी जनजागृती झाल्याने सूचना व हरकतींचा पाऊस पालिकेच्या उद्यान विभागावर पडला आहे. सूचना व हरकती देणार्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आमदार गणेश नाईक, संजिव नाईक यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. अनेक पर्यावरण तज्ज्ञांनी आणि वृक्षप्रेमींनी या वृक्षतोडीला मोठा आक्षेप नोंदवला असून पालिकेचा वृक्षप्राधिकरण विभाग याबाबत कोणता निर्णय घेते याकडे संपुर्ण नवी मुंबईचे लक्ष लागले आहे.
या सूचना व हरकतींमध्ये प्रामुख्याने शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश नसल्याची चर्चा महापालिकेत आहे. उड्डाणपुलाचे काम हे पालकमंत्री यांच्या जवळच्या व्यक्तीस देण्यात आल्याची चर्चा नवी मुंबईत असल्याने स्थानिक शिवसेना पदाधिकारी यापासून दूर राहिल्याने शिवसेनेचा या वृक्षतोडीस मुकसंमती असल्याची भावना नवी मुंबईकरांमध्ये वाढीस लागली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनीच सेनेला रामराम ठोकल्याने नवी मुंबईतील शिवसैनिकांची अवस्था तेलही गेले, तुपही गेले हाती धुपाटणे आले अशी झाली आहे.
- वृक्ष वाचविण्यासाठी सूचना व हरकतींचा पाऊस पालिकेच्या उद्यान विभागावर पडला आहे. सूचना व हरकतींमध्ये प्रामुख्याने शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश नसल्याची चर्चा महापालिकेत आहे.
- उड्डाणपुलाचे काम हे पालकमंत्री यांच्या जवळच्या व्यक्तीस देण्यात आल्याने स्थानिक शिवसेना पदाधिकारी या हरकतींपासून दूर राहिल्याची चर्चा सुरु आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai