राज्यात ‘शिंदे’शाहीला प्रारंभ
- by मोना माळी-सणस
- Jun 30, 2022
- 822
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री
मुंबई ः आठवडाभर सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा पडला आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यामुळे राज्यात ‘शिंदे’शाहीचा प्रारंभ झाला असल्याची चर्चा राज्यात सुरु आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्याने ठाकरे सरकार कोसळले. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत असताना अचानक शिंदे यांच्या नावाची घोषणा खुद्द फडणवीस यांनी केल्याने अख्खा महाराष्ट्र अवाक झाला. मा. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की.. असा एकच आवाज दुमदुमला आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर मंत्रिमंडळात राहणार नसून बाहेरुन पांठिबा देणार म्हणणार्या देवेंद्र फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द :
- 1997 व 2002 दोन वेळा नगरसेवक, तीन वर्षे स्थायी समिती सदस्य, चार वर्षे सभागृह नेता, महानगरपालिका ठाणे.
- 2004, 2009,2014,2019 चार वेळा आमदार;
- 2014 ते 2019 विधीमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते;
- 12 नोव्हेंबर 2014 ते 5 डिसेंबर 2014 विधानसभा विरोधी पक्ष नेता,
- 5 डिसेंबर ते नोव्हेंबर 2019 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री; तसेच जानेवारी 2019 सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री;
- ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; डिसेंबर 2019 पासून शिवसेनेचे गटनेते;
- नोव्हेंबर 2019 पासून नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याचे मंत्री.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस