Breaking News
नवी मुंबई ः जुनच्या सुरुवातीपासून दडी मारलेल्या पावसाने 20 जुनपासून हजेरी लावली आहे. पावसाने नवी मुंबईकर सुखावले असले तरी मोरबे धरण क्षेत्रात हवा तसा पाऊस पडलेला नाही. 30 जुनपर्यंत मोरबे धरण क्षेत्रात 218.40 मि.मी तर नवी मुंबईत 241 मि.मी पाऊस झाला. मोरबे धरणाची पाणीपातळी 69.84 मि.मी. पर्यंत पोहचली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी कमी पावसाची नोंद झाल्याने मोरबेत पाचपट कमी पातळी झाली आहे. उरलेल्या तीन महिन्यात दमदार पाऊस नाही झाला तर नवी मुंबईवर पाणीकपातीचे संकट ओढावेल.
महिनाभर दडी मारुन बसलेल्या पावसाने जुनच्या अखेरीस हजेरी लावली. गुरुवार, शुक्रवार पावसाची संततधार सुरु आहे. पावसामुळे नवी मुंबईकरांना गारवा दिला असला तरी मोरबेत अजून दमदार पाऊस न झाल्याने त्यांची चिंताही वाढली आहे. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणार्या मोरबे धरणात सलग तीन वर्ष विसर्ग करावा लागत आहे. धरण तुंडूब भरत असल्याने नवी मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागत नाही. मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा यामुळे करता येता. दिवसाला 470 एलएलडी पाणीपुरवठ्याचे नियोजन शहरासाठी केले जाते. वितरणादरम्यान 18.53 टक्के पाणी वाया जात असले तर 385 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. मोरबेची एकूण पाणीपातळी 88 मीटर असून आतापर्यंत धरण क्षेत्रात 218.40 मि.मी पावसाची नोंद झाली असून पाणीपातळी 69.84 मि.मी. पर्यंत पोहचली आहे. परंतु, गतवर्षीपेक्षा यंदा धरण क्षेत्रात कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे या क्षेत्रात दमदार पाऊस कधी पडतो याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. उर्वरित तीन महिन्यात हवा तसा पाऊस झाला नाही. तर नवी मुंबईकरांवर पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. पुर्ण धरण भरायला 19 मि.मी पाणीपातळीची गरज आहे. त्यामुळे तीन महिन्यात ते सहज शक्य असल्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु तत्पुर्वी पावसाने दडी मारली तर आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन पालिकेला करावे लागले. त्यामुळे पालिका प्रशासन शहरातील व मोरबे धरणातील दैनंदिन पावसावर नजर ठेवून आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस