Breaking News
न्यु बॉम्बे सिटी स्कूलची वारकरी दिंडी उत्साहात
नवी मुुंबई : आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर उभे राहते ते वारी, दिंडी आणि विठूरायाचा पालखी सोहळा. शहरातील विविध शाळांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थी वारकर्यांची वेशभूषा करून शाळेच्या परिसरातून दिंडी काढली जाते. घणसोलीतील न्यु बॉम्बे सिटी स्कूलने देखील अशाच दिंडी सोहळ्याचे शनिवारी आयोजन केले होते. शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या ‘विठ्ठल नामाच्या शाळेत’ उत्साह भरला.
महाराष्ट्र ही संताची भुमी म्हणून ओळखली जाते. अनेक सांस्कृतिक व पारंपरिक वारसा लाभलेल्या या राज्याची संस्कृती जगभरातील जनतेला आकर्षित करते. हाच वारसा नव्या पिढीने पुढे न्यावा यासाठी शाळापातळीवर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विठुराया व आषाढीचे महत्व चिमुकल्यांना कळावे म्हणून शहर परिसरात दिंडीचे आयोजन करुन उपक्रम राबविण्यात येतात. शैक्षणिक वर्षातील शाळेत मोठ्या उत्साहात होणारा पहिला सण म्हणून विद्यार्थीही आषाढी एकादशीची वाट पाहत असतात. घणसोली सेक्टर 9 येथील न्यु बॉम्बे सिटी स्कुल अँण्ड ज्युनिअर कॉलेजच्यावतीने देखील विद्यार्थ्यांसाठी शनिवारी दिंडीचे आयोजन केले होते. दीपप्रज्वलन, पालखीपूजन करुन मान्यवरांच्या उपस्थितीत या सोहळ्यास सुरुवात झाली. यात चिमुकल्यांनी विठुरायाचा जयघोष करत उत्स्फुर्त सहभाग घेतला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीची माहिती दिली. लेझीम, फुगडी, ढोलाच्या गजरात हा सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांनी वारकर्यांची वेशभूषा केली होती. यातील लहानगे विठ्ठल-रखुमाई सर्वांचेच लक्ष वेधुन घेत होते. विशेष म्हणजे येथील नवीन वसाहत असलेल्या मेघमल्हार सोसायटीमध्ये या पालखी मिरवणुकीचेे मोठ्या उत्साहात स्वागत करुन विद्यार्थ्यांना फळवाटप करण्यात आले. लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत सगळेच या विठ्ठल नामाचा गजरात दंगुन गेले होते. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून घणसोली नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. वैशाली म्हात्रे उपस्थित होत्या. तसेच मराठी-सेमी माध्यम विभागाच्या मुख्याध्यापिका कविता भोसले, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सुरेखा पिसाळ, सीबीएसई विभागाच्या मुख्याध्यापिका अवनीत कौर यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस