निवडणुकीसाठी ओबीसी उमेदवारांचा मार्ग मोकळा
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 23, 2022
- 672
- नवी मुंबई पालिकेत 33 जागा ओबीसींच्या वाट्याला
नवी मुंबई : बांठीया आयोगाने दिलेला अहवाल बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ओबींसी आरक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. परिणामी नवी मुंबई महापालिकेतील ओबीसी नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे नवी मुंबईत 122 जागांपैकी जवळपास 33 जागा ओबीसींना मिळणार आहेत.
ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई महापालिका आणि पनवेल महापालिका या दोन्ही महापालिकेत ओबीसी नगरसेवकांची मक्तेदारी राहिली आहे. कोविडमुळे दोन वर्षे नवी मुंबईतील उमेदवार निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने त्याचा फटका नवी मुंबई परिसरातील उमेदवारांना बसला होता. बहुतांश प्रस्थापित उमेदवारांनी दुसर्या मतदार संघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. तर काहींनी मागास प्रवर्गातील आपले इतर कार्यकर्ते शोधण्यास सुरुवात केली होती. अनेकांना सर्वसामान्यांच्या जागेतून उभे राहावे लागणार होते. अथवा त्यांच्या पारंपरिक जागांवर पाणी सोडावे लागणार होते.
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक विभागाने तर जातीय आरक्षण सोडत काढून मागासवर्गीय, 50 टक्के महिला आरक्षण आणि सर्वसामान्य जागांमधून सोडत काढून जागा निश्चिती केल्या होत्या. त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनंतर अनुसूचित जाती-जमाती यासाठी आरक्षण सोडत मार्चमध्ये पार पडली.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे महापालिकेतील राजकीय परिस्थिती पुन्हा बदलणार आहे. मात्र नवी मुंबई महापालिका निवडणुकीत ओबीसींची एकूण टक्केवारी गृहित धरुन 20.5 टक्के ओबीसींसाठी आरक्षण दिले तर महापालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून 22 ओबीसी महिला-पुरुषांचा मार्ग मोकळा होईल.
राज्य निवडणुक आयोगाकडून ओबीसींचे आरक्षण व प्रभाग रचनेबाबत अद्याप कोणतेही लेखी आदेश नवी मुंबई पालिकेला प्राप्त झाले नसून निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणासंदर्भात कार्यवाही केली जाईल असे पालिका आयुक्तांनी सांगितले.
आयोगाच्या शिफारसी
- राज्यात ओबीसींची लोकसंख्या 37 टक्के
- 27 टक्के राजकीय आरक्षण देण्याची शिफारस
- प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात ओबीसींचं वेगवेगळं प्रमाण
- एससी, एसटी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण
- एकूण आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा कायम
- अनुसूचित जमातींची लोकसंख्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर ओबीसी आरक्षण नाही
- कोणाला किती जागा मिळणार
नवी मुंबई महापालिकेच्या 2015 ला झालेल्या निवडणूक 111 जागा होत्या. त्यावेळेस पालिकेला मिळालेल्या 27 टक्के ओबीसी आरक्षणामुळे 30 जागा मिळाल्या होत्या. पुन्हा 27 टक्के आरक्षण मिळाल्यास वाढलेल्या 122 या नगरसेवक संख्येनुसार ओबीसींच्या वाट्याला 33 जागा येणार आहेत. पनवेल महापालिका निवडणुकीत याआधी 78 होत्या. तेव्हा 21 जागा मिळाल्या होत्या. आता 89 झाल्या आहेत. ओबीसी आरक्षणामुळे 27 टक्के आरक्षण आल्यास ओबीसींच्या वाट्याला 24 जागा येतील.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai