रासायनिक पाण्यामुळे मासे मृत्यूमुखी
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 27, 2022
- 626
उरण ः सोमवारी रात्री भेंडखळ गावानजिक असलेल्या खाडीत अज्ञात व्यक्तीने रासायनिक पाणी टँकरद्वारे खाडीच्या पाणीत सोडले. त्यामुळे सर्व मासे, जलचर प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. वारंवार अशा घटना घडत असल्याने भेंडखळ ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. या प्रकारामुळे स्थानिक प्राधिकरण व पोलीस प्रशासनाला या घटना रोखण्यास अपयश येत असल्याची चर्चा आहे.
बाहेरील वाहने अंधाराचा फायदा घेऊन अर्ध्या रात्री अशा केमिकलयुक्त रसायनांचा साठा गुपचूपपणे खाडीमध्ये सोडतात. यामुळे पाण्यातील मासे, साप कासव आदी प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. तर अनेक जलचर मृत्युमुखी पडतात. जलप्रदुषणही होत असल्याने शासनाने या गोष्टीची खोलवर दखल घ्यावी व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी भेंडखळ ग्रामस्थांनी केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai