कामगारांना 11 हजार रुपयांची पगारवाढ
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 29, 2022
- 644
उरण ः मे. रायटर बिझनेस सर्व्हिसेस महापे मधील कामगारांच्या पगारवाढीचा प्रश्न बरेच महिने प्रलंबित होता. व्यवस्थापन संघटना नको म्हणून पगारवाढ करण्यास तयार नव्हते. परंतु न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या सातत्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. कामगार आयुक्त ठाणे यांच्या उपस्थितीत 25 जुलै 2022 रोजी पगारवाढीचा करार करण्यात आला. या करारनाम्यानुसार कामगारांना तीन वर्षांसाठी तब्बल 11,000 रुपये पगारवाढ करण्यात आली. तसेच दोन ग्रॉस सॅलरी बोनस, 25 लाख रुपयांची अक्सिडेंटल पॉलिसी देण्याचे मान्य करण्यात आले. बरेच दिवसानंतर कामगारांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून मार्गी लागल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
हा करारनामा कामगार उपायुक्त ठाणे दाभाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत, कार्याध्यक्ष पी. के. रामण, सरचिटणीस वैभव पाटील, कामगार प्रतिनिधी आर.ए.चौरे, धर्मेंद्र जोशी, संतोष पाटील, माणिक लोंढे, जीवन भोईर तर व्यवस्थापनातर्फे जो ब्रिस्टन हे उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai