अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 29, 2022
- 593
नवी मुंबई ः कोरखैरणे सेक्टर 18 येथील घर क्र.23, 24, 25, 26 यांना 23 मे 2022 रोजी वापरत बदल केल्यामुळे नोटीस बजावण्यात आली होती. त्यांनी महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतरित्या बांधकाम चालू केले होते. त्याचप्रमाणे कोपरखैरणे सेक्टर 1 ए येथील भूखंड क्र 43 याठिकाणी असलेल्या अनधिकृत पावसाळी शेड वर कारवाई करून हे शेड हटविण्यात आलेले आहे. हे शेड हटविणे खर्चाचे वसुलीपोटी रुपये 10 हजार इतकी दंडात्मक रक्कम
वसूल करण्यात आली असून अनधिकृत बांधकामापोटी रक्कम रु.10 हजार अशी एकूण रक्कम रु.20 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. या दोन्ही अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून ही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलेली आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai